ठरलं होतं १६० नागरिकांना UP ला घेऊन जायचं, पण हुशार पोलिसांमुळे असा फिस्कटला प्लान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मे 2020

देशात कोरोनाच्या संकटाने धुमाकुळ घातला असुन, या संकटाला हरविण्यासाठी संपूर्ण देशात लाॅकडाऊन घोषीत केला आहे. अशातच कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या मुंबईतील नागरीकाना उत्तर प्रदेशला घेऊन निघालेले तीन ट्रक रफी किडवाई मार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

मुंबई - देशात कोरोनाच्या संकटाने धुमाकुळ घातला असुन, या संकटाला हरविण्यासाठी संपूर्ण देशात लाॅकडाऊन घोषीत केला आहे. अशातच कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या मुंबईतील नागरीकाना उत्तर प्रदेशला घेऊन निघालेले तीन ट्रक रफी किडवाई मार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर याप्रकरणी चालक-वाहकांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

तरबेज सुलेमान (25), मोहमद वसीम मो हुसेन चौधरी (50), धर्मेंद्र कुमार छोटेलाल हरिजन (32), क्लिनर सैफउद्दीन इस्माईल खान (25) यांना अटक केली आहे. आर.ए. के.मार्ग पोलीस ठाणे अंतर्गत ज्ञानेश्वर नगर जंकशन याठिकाणी नाकाबंदी चालू असताना तीन ट्रक एका मागोमाग येत होते. नाकाबंदीवर असलेल्या पोलिस पथकाने  त्यांना पाहिले असता ते ट्रक बंदिस्त असल्याने यावेळी पोलिसांना संशय आला. त्यांना थांबवून पाहणी केली असता त्या ट्रक्समधून एकूण 160 नागरीकांची मुंबई ते उत्तर प्रदेश अशी बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.

लालपरी निघाली ! आजपासून एसटीची मोफत सेवा; वाचा कुणाला आणि कुठे प्रवास करता येणार...

यावेळी तात्काळ प्रवाशांना आणि वाहन चालकांना ताब्यात घेण्यात आलंय. या सर्वांवर कोरोनामुळे मुंबईमध्ये आणि देशात लॉकडाऊन असताना त्याचा भंग करून विनापरवाना लोकांची वाहतूक केल्याप्रकरणी आर ए के मार्ग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोरोनाच्या थैमानात वरळी कोळीवाड्यातून आली 'ही' गुडन्यूज! वाचा बातमी सविस्तर

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व परप्रांतीय नागरीकांच्या खाण्याची व पिण्याची व्यवस्था केली आहे. आरोपींनी त्यांच्याकडून प्रत्येकी चार हजार रुपये घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. यापूर्वीही आरएके मार्ग पोलिसांनी एक ट्रक ताब्यात घेतला होता. त्यात 40 नागरीक होते. ते सर्वजण उत्तर प्रदेशातील इलाहाबाद येथे जात होते. आरएके मार्ग पोलिसांच्या हद्दीत मुंबई बाहेर जाणारा मुख्य रस्ता असल्यामुळे त्यांनी या परिसरात नाकाबंदी लावली असून संशयीत गाड्या अडवून त्यांची तपासणी सुरू आहे. 

police caught 3 trucks with 160 people illegally travelling from mumbai to UP


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police caught 3 trucks with 160 people illegally travelling from mumbai to UP