डोंबिवली : २८५ एकर जमिनीचा वाद भोवला; माजी नगरसेवकासह शेतकऱ्यांवर गुन्हा

police fir
police firsakal media

डोंबिवली : पिंपरी गाव येथी 285 एकर जागेवरुन (Pimpari village land issue) सध्या कल्याण ग्रामीण भागात वादंग सुरु आहे. या वादातून काही दिवसांपूर्वी एकनाथ मोकाशी व त्यांच्या परिवारास मारहाण झाल्याची घटना मोकाशी पाडा परिसरात घडली होती. याप्रकरणी शीळ डायघर पोलिस ठाण्यात (shil daighar police station) परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डोंबिवलीतील शिवसेनेचे (shivsena) माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर पाच दिवसांनी गुन्हा दाखल (Police complaint filed) झाल्यानंतर त्यांच्या अंगरक्षकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत मोकाशी कुटुंबाविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

police fir
भिवंडी : घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल; ७ जणांना अटक

कल्याण ग्रामीण भागातील दहिसर, दहिसर मोरी व मोकाशी पाडा या तीन गावांची मिळून 285 एकर जमीन असून या जमिनीचा सातबारा हा पंचांच्या नावे आहे. यातील आता केवळ 6 पंच उरले आहेत. या जमिनीच्या विक्रीवरुन गावांत वाद असून याच वादातून 3 फेब्रुवारीला मोकाशी पाडा येथे राहणारे एकनाथ मोकाशी त्यांची मुले देविदास व प्रशांत यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. ही मारहाण डोंबिवलीतील माजी नगरसेवकाने केल्याचा आरोप एकनाथ यांनी केला होता. मात्र याप्रकरणी शीळ डायघर पोलिस गुन्हा नोंद करुन घेण्यास तयार नव्हते.

कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी याचा पाठपुरावा केल्यानंतर पाच दिवसांनी पोलिस ठाण्यात माजी नगरसेवकासह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल होताच दुसऱ्याच दिवशी म्हात्रे यांच्या अंगरक्षकाने पोलिस ठाणे गाठत त्यांना मोकाशी कुटूंबाने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे याप्रकरणी शीळ डायघर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

police fir
मुंबईकरांना दिलासा; जंबो कोविड केंद्र झाली रिक्त, केवळ 200 रुग्ण दाखल

आम्ही मारहाण केली नसल्याचा त्यांचा दावा

याविषयी माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत या घटनेची माहिती दिली. या जमिनीचा सातबारा हा पंचांच्या नावे असून, त्या जागेसाठी काही व्यावसायिक आले आहेत. त्या व्यवहारातील पैसे हे पंचांच्या नावावर जाणार असून त्यांचे खाते बॅंकेत असणे आवश्यक आहे. पंचांनी खातेच उघडले नसल्याने व्यावसायिकांनी चेक कोणाच्या नावावर द्यायचा असे गावकऱ्यांचे म्हणने असल्याने पंचांनी खाते उघडावे, त्यासाठी सही करावी यासाठी मी तिथे गेलो होतो. आम्ही त्यांना मारहाण केलेली नाही असा दावा माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केला आहे. तसेच ही जमिन कोणीही लाटत नाही, तर जागेचा गैरवापर करुन बळीराम भोईर व एकनाथ मोकाशी हे स्वतःचा फायदा करुन घेत आहे. ते पंच असून त्यांच्याच नावावर सातबारा आहे, व त्यांची सही असल्याशिवाय जमिन विक्री होऊ शकत नाही असेही ते म्हणाले.

शिवसेनेचा आजी माजी आमदारांवर निशाणा

आमदारांनी मी लोकांचा प्रतिनिधी आहे असे समजायचे की कॉलर ताठ करुन मी आमदार आहे हे समजायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. लोकांची कामे, त्यांच्या समस्या सोडवाव्यात. विकास कामे करावित, आपआपसातील छोटी मोठी भांडणे मिटविणे ही आमदारांची कामे आहेत, त्यानुसार त्यांनी हा वाद मिटवायला हवा होता. मात्र दोन लोक स्वतःच्या फायद्यासाठी गावातील 500 लोकांना वेठीस धरतात आणि त्या दोन लोकांना पाटील सपोर्ट करतात असा आरोप म्हात्रे यांनी आमदार राजू पाटील यांच्यावर केला. तसेच पाटील हे सहा तास ठिय्या मांडून पोलिस ठाण्यात होते, त्यांच्याने काही झाले नाही तर शिवसेनेचे माजी आमदार भोईर त्यांच्या मदतीला गेले असे म्हणत त्यांनी भोईर यांच्यावर देखील निशाणा साधला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com