मोस्ट वॉन्टेड बुकीला पकडण्यात पोलिस फेल

दिनेश गोगी
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

उल्हासनगर : न्यायालयाची दिशाभूल करून आणि जामीन मिळवून फरार झालेल्या उल्हासनगरातील मोस्ट वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानी याला पकडण्यात मुंबई पोलिस फेल झाले आहेत. याबाबत उच्च न्यायालय आक्रमक झाले असून या बुकीला 17 सप्टेंबर पर्यंत पकडले नाही तर तपास सीबीआय कडे सोपवला जाईल. असे न्यायालयाने बजावल्याने पोलिसांसमोर जयसिंघानी याला पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

उल्हासनगर : न्यायालयाची दिशाभूल करून आणि जामीन मिळवून फरार झालेल्या उल्हासनगरातील मोस्ट वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानी याला पकडण्यात मुंबई पोलिस फेल झाले आहेत. याबाबत उच्च न्यायालय आक्रमक झाले असून या बुकीला 17 सप्टेंबर पर्यंत पकडले नाही तर तपास सीबीआय कडे सोपवला जाईल. असे न्यायालयाने बजावल्याने पोलिसांसमोर जयसिंघानी याला पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

अनिल जयसिंघानी याला 15-16 वर्षांपूर्वी पोलिस उपायुक्त अमर जाधव यांनी क्रिकेटच्या सट्टेबाजीच्या (बुकी) प्रकरणात अटक केली होती. त्याच्यावर उल्हासनगर, आझाद मैदान, साकिना, अहमदाबाद, गोवा आदी पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्याची नोंद आहे. 2015 मध्ये गुजरात अहमदाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत ईडी प्रकरणात अनिल जयसिंघानी फरार झाला होता. त्याच्यावर अटक वॉरंट निघाल्यावर जयसिंघानी याने पत्नी लिलावती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असल्याचे कारण सांगून लिलावती हॉस्पिटलचे बोगस कागदपत्रे सादर करून उच्च न्यायलया कडून ट्रांझिस्ट बेल मिळवली होती. उल्हासनगरातील उद्योजक माजी शिवसेना नगरसेवक किशोर केसवानी यांनी जयसिंघानी याने ट्रांझिस्ट बेलसाठी वापरलेले हॉस्पिटलचे कागदपत्रे बोगस असल्याचे प्रमाणपत्र उच्च न्यायालयात सादर केले होते. हॉस्पिटलच्या डीन ने देखील सही शिक्का व लेटरपॅड वरील लिखावट आमची नाही. असे स्पस्ट केल्याने 2016 मध्ये आझाद मैदान पोलिस ठाण्यात न्यायालयाची दिशाभूल करण्याचा गुन्हा अनिल जयसिंघानी याच्यावर दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी वारंवार उल्हासनगरात येऊन जयसिंघानी याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मिळून येत नसल्याने आझाद मैदानचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब मिसाळ यांनी सिंधी कौंशील ऑफ इंडियाचे माजी उल्हासनगर अध्यक्ष ढालू नाथानी यांच्या सहकार्याने जयसिंघानी राहत असलेल्या गोलमैदान परिसरात अनिल जयसिंघानी याचे मोस्ट वांटेड ची पोस्टर्स झळकवले आहेत.

दरम्यान किशोर केसवानी यांनी जयसिंघानी हा आझाद मैदान ठाण्याच्या हद्दीत न्यायालयाची दिशाभूल केल्या प्रकरणात फरार असून तो सापडत नसल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. काल मुंबई पोलिसांनी आम्ही उल्हासनगर सह सर्वत्र अनिल जयसिंघानी याचा शोध घेत आहोत. पण तो सापडून येत नाही. असे न्यायालयाला सांगितल्यावर न्यायालयाने मुंबई पोलिसांना सुनावले आहे. 17 सप्टेंबर पर्यंत जयसिंघानी याला पकडले नाही तर तपास सीबीआय कडे सोपवला जाणार असे बजावले आहे. याशिवाय ऑगस्ट अखेरपर्यंत अनिल जयसिंघानी याने न्यायालय किंवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले नाही तर त्याच्या संपत्तीवर जप्तीची टांगती तलवार उभी राहणार असल्याची माहिती किशोर केसवानी यांनी सकाळ शी बोलताना दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Fail to Catch Most Wanted criminal