पोलिसांना लागली टीप, अन् मक्याच्या कणसांखाली सापडला सव्वा कोटींचा गांजा; ट्रकचा चालक फरार

दीपक शेलार
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

मक्याच्या कणसाने भरलेल्या ट्रकमधून त्याची वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांनी ट्रकसह 1 कोटी 63 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. 

ठाणे : चितळसर पोलिसांनी घोडबंदर रोडवर शनिवारी पहाटे तब्बल 691 किलो गांजा हस्तगत केला. मक्याच्या कणसाने भरलेल्या ट्रकमधून त्याची वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांनी ट्रकसह 1 कोटी 63 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. 

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ 'या' तारखेला प्लाझ्मादान शिबीर आयोजित करणार

एका ट्रकमधून गांजा येणार असल्याची माहिती चितळसर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ  निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली   निरीक्षक प्रियतमा मुठे, सहाय्यक निरीक्षक शशिकांत रोकडे,  उपनिरीक्षक धनराज केदार व त्यांच्या पथकाने पहाटे 3 वाजेच्या सुमारास घोडबंदर रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठजवळ नाकाबंदी केली. या वेळी घटनास्थळी एक लाल रंगाचा ट्रक बेवारसपणे उभा असल्याचे पोलिसांना आढळून आले.  या ट्रकची तपासणी केली असता त्यात मक्याची कणसे व त्याखाली गांजा लपवून ठेवल्याचे दिसून आले.

मटका किंग जिग्नेश ठक्करची हत्या; कार्यालयातून बाहेर पडताना बेछूट गोळीबार

पोलिसांनी गांजा व ट्रक जप्त केला.  ट्रकमध्ये तब्बल 691 किलो गांजा होता. तयाची किंमत 1 कोटी 38 लाख रुपये इतकी असून जप्त ट्रकची किंमत 25 लाख इतकी असल्याचे पोलिसांनी संगितले.  ट्रकचा नंबर केए 28 ए 9095 असा असून त्यावरील चालक फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चालक व मालक यांच्या विरोधात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. हा गांजा कोठून आणण्यात आला व तो ठाण्यात कुठे पुरवठा करण्यात येणार होता याचा तपास सुरू असल्याचे  उपआयुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले.
-----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police found a cannabis worth Rs. one crore The truck driver absconded