esakal | दुसरे एटीएम फोडायच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

दुसरे एटीएम फोडायच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - डोंबिवलीतील (Dombivali) टिळक रोडवरील एटीएम (ATM) त्याने फोडले पण हाती काहीच रक्कम लागली नाही. त्यानंतर चोरटा किनारा बारजवळील दुसरे एटीएम (ATM) फोडण्यास गेला. त्याचवेळी रामनगर (Ram Nagar) पोलिसांनी (Police) त्याला बेड्या ठोकल्या. मोहम्मद शेख (Mohammed Sheikh) (वय 20) असे चोराचे नाव असून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने (District Court) त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

डोंबिवली पूर्वेतील ओजस हॉस्पिटल शेजारी असलेले एटीएम मंगळवारी रात्री मोहम्मद याने फोडले. मात्र त्यामध्ये पैसेच नसल्याने त्याच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. त्याचवेळी तेथे नोकरी करणारे राहुल शिंदे हे आले असता एटीएम चोरीच्या उद्देशाने फोडले गेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित 100 नंबरवर कॉल करीत पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी रामनगर पोलीसांना याची माहिती देताच सहायक पोलीस निरीक्षक विकास सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक दीपक दाभाडे, पोलीस हवालदार निवले, पोलीस नाईक विशाल वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तेथील सीसीटीव्ही फुटेज पहात आजूबाजूच्या परिसरात चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली. टिळकनगर परिसरात किनाराबार जवळ मोहम्मद हा संशयास्पद रित्या दिसला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपासणीत स्क्रू ड्रायव्हर आशा काही गोष्टी आढळून आल्या. त्याला अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

हेही वाचा: कोंबड्यांपासून सोन्यापर्यंत सारं चोरलं... बेळंकीत अट्टल चोरट्यास जेरबंद; 8 गुन्हे उघडकीस

अवघ्या 2 तासात चोरट्यास पकडण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. बुधवारी त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दाभाडे यांनी दिली.

loading image
go to top