जनाबसेनेने लाजधर्म सोडला माजधर्म स्वीकारला; राऊत यांच्या राजधर्माच्या ट्वीटवर भाजपचा हल्ला

जनाबसेनेने लाजधर्म सोडला माजधर्म स्वीकारला; राऊत यांच्या राजधर्माच्या ट्वीटवर भाजपचा हल्ला

मुंबई - पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्या राजिनामा घेण्याचा चंग बाधलेल्या भाजप नेत्यांनी आजही महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान सुरुच ठेवले. अतुल भातखळकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदींनी आजही राजधर्मावरून सरकारवर कोरडे ओढले. 

विशेष म्हणजे महाराष्ट्रधर्म म्हणजे काय हे सांगण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सिंहासनाधिष्ठित शिवरायांचा राजदंड दाखविलेल्या छायाचित्रावरूनच या दोघा भाजप नेत्यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका करण्याची संधी साधली आहे. 

>

राठोड यांच्या राजिनाम्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा एक भाग म्हणून रोज पत्रकार परिषदा, महिला मोर्चांची आंदोलने, समाजमाध्यमांवरून शेलक्या शब्दांतील टीकेचा भडीमार असे हल्ले चढविण्याचे सत्र भाजप नेत्यांनी रोजच जारी ठेवले आहे. आजही भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला छत्रपती शिवरायांच्या राजधर्माची आठवण करून दिली आहे. तर जनाबसेनेने `लाज`धर्म ही सोडला असून माजधर्म स्वीकारला आहे, मग राजधर्म औषधालातरी शिल्लक राहील का, अशी बोचरी टीका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

भातखळकर यांनी ट्वीटद्वारे सरकारवर हल्ला चढविला आहे. सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो, महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन, असे दाखविणारे संजय राऊत यांच्या छायाचित्राचे ट्वीटदेखील त्यांनी सोबत जोडले आहे. महाराष्ट्रात जनाबसेनेने लाजधर्म सोडला, गब्रूंना पाठीशी घालण्याचा माजधर्म स्वीकारला, मग राजधर्म औषधाला तरी शिल्लक राहील काय ? असा प्रश्न भातखळकर यांनी त्यावर विचारला आहे. 

तर केशव उपाध्ये यांनीही राऊत यांच्या याच ट्वीट ला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महिलेवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाला शिक्षा करणारे महाराज कुठे आणि संजय राठोड - पूजा चव्हाण प्रकरणी नुसते गप्पच नाही तर त्याच्या सोबत कॅबिनेट मध्ये बसणारे कुठे ? कशाला महारांजाच्या राजधर्माची आठवण करताय, आता फक्त सत्ताधर्म सुरू आहे राज्यात, अशी जळजळीत टीका उपाध्ये यांनी केली आहे. त्यामुळे आता विधीमंडळात देखील या प्रश्नावरून रणकंदन माजण्याची चिन्हे दिसत आहेत.

-----------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

shivsena left Lajdharma accepted Mazdharma BJP attacks shivsena rajdharma

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com