esakal | कोरोना संकट वाढलं असेल तर निवडणुका पुढे ढकला - राज ठाकरे

बोलून बातमी शोधा

कोरोना संकट वाढलं असेल तर निवडणुका पुढे ढकला - राज ठाकरे}

एवढं करोनाचं संकट समोर येतंय असं वाटत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला. जाहीर केल्या जाणाऱ्या सर्व निवडणुका पुढे ढकला,” अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

कोरोना संकट वाढलं असेल तर निवडणुका पुढे ढकला - राज ठाकरे
sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई  : सरकारच्या कार्यक्रमाला गर्दी होते. सरकारमधील मंत्री सगळ्या कार्यक्रमांमध्ये धुडगूस घालू शकतात गर्दी करुन आणि शिवजयंतीला तुम्ही नकार देता. मराठी भाषा दिनाला नकार देता. एवढं करोनाचं संकट समोर येतंय असं वाटत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला. जाहीर केल्या जाणाऱ्या सर्व निवडणुका पुढे ढकला,” अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्यानंतरहीमनसे कडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानिमित्त मनसेने दादरमध्ये स्वाक्षरी मोहिमेचा कार्यक्रम राबवला. या कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ही उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या तोंडावर मास्क न घालता सहभाग घेतला. याचसंदर्भात त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी अगदी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

दादरमध्ये मनसेने आयोजित केलेल्या मराठी स्वाक्षरी मोहिमेसाठी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. राज ठाकरेंनी मोहिमेच्या फलकावर स्वाक्षरी करत या मोहिमेला सुरुवात केली. यावेळी राज यांना मास्क न घातल्याबाबत प्रश्न विचारला असता, राज यांनी, “मी घालत पण नाही, आणि मी तुम्हालाही सांगतो,” असं उत्तर देत तिथून निघून गेले.

परवानगी नसताना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याबाबत प्रश्न विचारला असता राज यांनी सांगितले की, “बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते, सरकारच्या कार्यक्रमाला गर्दी होते. सरकारमधील मंत्री सगळ्या कार्यक्रमांमध्ये गर्दी करून धुडगूस घालू शकतात आणि शिवजयंतीला तुम्ही नकार देता. मराठी भाषा दिनाला नकार देता. एवढं करोनाचं संकट समोर येतंय असं वाटत असेल तर जाहीर केलेल्या सगळ्या निवडणुका पुढे ढकला अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.

मनसेकडून मराठी भाषा दिना निमित्ताने दरवर्षी कार्यक्रम घेतले जातात. या वर्षी खुद्द राज ठाकरेंनी जाहीर पत्राद्वारे ‘मराठी स्वाक्षरी मोहिमे’चं आवाहन केलं. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून राज ठाकरेंच्या सहीनिशी हे पत्र पोस्ट करण्यात आलं. त्यानंतर दादरमध्ये स्वाक्षरीची मोहीम घेण्यात आली. या कार्यक्रमाला अमेय खोपकर, अवधुत गुप्ते, सायली शिंदेसहीत अनेक मराठी कलाकार उपस्थित होते.
.......

उदयनराजे राज ठाकरेंच्या भेटीला

भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली.

मराठा आरक्षणाच्या मुद्दावर उदयनराजे भोसले सध्या राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. राज ठाकरे यांची भेट देखील मराठा आरक्षणाच्या मुद्दावर झाल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजता उदयनराजेंनी राज यांची भेट घेतली. उदयनराजे यांची कृष्णकुंजवरील ही पहिलीच भेट होती. या वेळी उदयनराजे यांनी राज यांना राजमुद्रा ही भेट दिली शिवाय आपल्या मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका ही दिली.

याआधी उदयनराजे यांनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. मात्र या भेटी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर होत्या, हे स्पष्ट झालं होतं. राज ठाकरे यांची भेट देखील याच मुद्दावर झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

--------------------------------------

political news marathi If Corona crisis has escalated then elections have been postponed Raj Thackeray