esakal | शिवजयंतीवर निर्बंध! शिवसेनेचे पुन्हा लोटांगण; भाजपची घणाघाती टीका
sakal

बोलून बातमी शोधा

शिवजयंतीवर निर्बंध! शिवसेनेचे पुन्हा लोटांगण; भाजपची घणाघाती टीका

सत्तेसाठी काँग्रेस - राष्ट्रवादी पुढे लोटांगण घालणाऱ्या शिवसेनेने आता शिवजयंती साजरी करण्यावर बंधने लादून 'घालीन लोटांगण, वंदीन चरण' चा नवा प्रयोग सादर केला आहे, अशी टीका भाजपने केली आहे. 

शिवजयंतीवर निर्बंध! शिवसेनेचे पुन्हा लोटांगण; भाजपची घणाघाती टीका

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई - सत्तेसाठी काँग्रेस - राष्ट्रवादी पुढे लोटांगण घालणाऱ्या शिवसेनेने आता शिवजयंती साजरी करण्यावर बंधने लादून 'घालीन लोटांगण, वंदीन चरण' चा नवा प्रयोग सादर केला आहे, अशी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.     

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यावर निर्बंध घालणाऱ्या महाआघाडी सरकारने आपला खरा 'रंग'  दाखवला आहे. हिंदू समाजाबाबत प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानीला अटक करण्यास महाआघाडी सरकार टाळाटाळ करते. पण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्यावर अनेक निर्बंध घालते हे योग्य नाही, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

शिवजयंती मिरवणुकीत पोवाडे, बाईक रॅली, मिरवणूका यावर आघाडी सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. पण एरवी दारूची दुकाने, नाईटलाइफ, बार सुरु करण्यास परवानगी देताना सरकार गर्दीचा विचार करीत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात कोरोना च्या नावाखाली अनेक अडचणी आणल्या जात आहेत. धार्मिक भावना भडकवणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी देताना आघाडी सरकार मागेपुढे पहात नाही. मात्र शिवजयंती राज्यकर्त्यांच्या डोळ्यात का खुपते ? असा सवालही उपाध्ये यांनी केला आहे.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

political news marathi shivajanti ban keshav upadhye bjp criticism politics live