kalyan dombivali congress Officials Resign
sakal
डोंबिवली - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण–डोंबिवलीत राजकीय हालचालींना वेग आला असताना आज काँग्रेसमध्ये मोठी स्फोटक घडामोड घडली आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक सचिन पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला असून, त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनीही पक्षातील पदांचे सामूहिक राजीनामे सादर करत काँग्रेसच्या स्थानिक संघटनेत मोठी धडधड निर्माण केली आहे.