
डोंबिवली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यापूर्वी अनेकदा शिंदे आणि ठाकरे यांची भेट झाली असली, तरी यावेळेसच्या त्यांच्या भेटीने एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षात वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असताना कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी देखील मनसेची शाखा गाठल्याने मनसे आणि शिवसेना शिंदे गटात नेमके काय सुरू आहे. पालिका निवडणूकीची ही गणित आहेत का ? याची चर्चा सुरू झाली आहे.