
आता ‘वॉर रूम’ किंवा ‘वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ अशा गोष्टी वेगवेगळ्या होणार असतील तर त्याचा धागा पकडून महायुतीतील भाजप-शिवसेनेत बेबनाव असल्याच्या चर्चा रंगतील. विधानसभेतले बहुमत निर्विवाद असल्याने सरकारवर परिणाम तर होणार नाहीच; पण विकासाच्या योजनांऐवजी बेबनावाच्या बातम्यांना बहर येईल.