esakal | टीका झोंबली! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीवर एसीबीकडुन गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

टीका झोंबली! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीवर एसीबीकडुन गुन्हा दाखल}

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे

टीका झोंबली! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीवर एसीबीकडुन गुन्हा दाखल
sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई - भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती अर्थात बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप किशोर वाघ यांच्यावर ठेवण्यात आला असुन, याचा अधिक तपास सुरू आहे.

किशोर वाघ यांच्यावर असा आरोप केला जात आहे की, त्यांच्याकडे असणारे 90.24 टक्के संपत्ती ही उपत्पन्नापेक्षा अधिक आहे. 2016 मधील एका प्रकरणाच्या तपासादरम्यान ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे किशोर वाघ यांना पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. किशोर वाघ यांच्यावर कलम 13 (1) (इ), कलम 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध नियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे 1 कोटी 3 लाख 46 हजार 663 रुपये अधिकची संपत्ती आढळून आली आहे. शिवाय विविध शहरात असणारी त्यांची मालमत्ता बेहिशोबी असल्याचा आरोप देखील केला जात आहे. किशोर वाघ हे मुंबईतील परेल याठिकाणी असणा-या गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते. 5 जुलै 2016 ला एका प्रकरणात 4 लाख रुपयांची लाच घेताना किशोर वाघ यांच्यासह महात्मा गांधी स्मारक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक गजानन तुळशीराम भगत, संदेश भास्कर कांबळे यांना अटक करण्यात आली होती.

मुंबई, पालघर, रायगड, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 अटक झाल्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले होते. या लाच प्रकरणानंतर 1 डिसेंबर 2006 ते दिनांक 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची एसीबीकडून चौकशीही करण्यात आली होती. यामध्ये कायदेशीर उत्पन्न, गुंतवणूक, ठेवी, खात्यावरील रकमेची आवक जावक, वारसाहक्काची मालमत्ता, खर्च इत्यादी बाबींचा सविस्तर तपास करण्यात आला. या तपासात किशोर वाघ यांच्याकडे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची अपसंपदा आढळून आली. किशोर वाघ यांच्याकडे असणारी ही अपसंपदा त्यांच्या एकूण उत्पन्नाच्य्ाा सुमारे 90 टक्के इतकी आहे. या खुल्या चौकशीच्या अहवालानुसार प्रथमदर्शनी दोषी आढळल्यामुळे लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ जगताप यांच्या तक्रारीवरुन किशोर वाघ यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये 13(2) व 13(1) या कलमांतर्गत दिनांक 12फेब्रुवारी 2021 ला मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा चव्हाण प्रकरणानंतर चित्रा वाघ यांनी आक्रमक होऊन महाविकास आघाडीला चांगलेच कोंडीत पकडले होते. या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

politics latest marathi ACB files case against BJP leader Chitra Waghs husband live update