
मुंबई - काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महाराष्ट्राला या अर्थसंकल्पात फार काही मिळाले नसल्याचे टीका केली. या टीकेला उत्तर देण्यासाठी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला किती निधी आणि कोणत्या कामासाठी दिला याबाबत सविस्तर माहिती दिली. पत्रकार परिषदेच्या माध्यमांतून अर्थसंकल्पावरील टीकेला फडणवीस यांनी उत्तर दिले.
केंद्रीय अर्थसंकल्प न वाचता, राज्याला अर्थसंकल्पात काहीच मिळाले नाही. महाराष्ट्र अर्थसंकल्पात कुठेच दिसतच नाही. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी अर्थसंकल्पाच्या संदर्भात सांगण्यात आल्या. त्यामुळे मी स्वतः या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं याचा अभ्यास केला. त्यातून जी माहिती समोर आली आहे. ती आपल्या समोर ठेवत आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.
राज्याला कोणत्या कामांसाठी किती निधी मिळाला
'राज्याला केंद्राकडून पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी अर्थसंकल्पात मंजूर कऱण्यात आला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काही मिळाले नाही. महाराष्ट्र अर्थसंकल्पात कुठे दिसत नाही. हे सपशेल खोटे आहे. अपेक्षा एवढीच आहे. राज्य सरकारने मेट्रो 3 सारखे इतर प्रकल्प थांबवू नये. ते पुर्ण करण्यासाठी निधी खर्च करण्यावर भर द्यावा', असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.
-------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
politics marathi Maharashtra gets huge funds from the budget 2021 devendra Fadnavis criticism political latest updates
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.