अधिवेशनावेळीच सरकारला कोरोना कसा दिसतो? देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

अधिवेशनावेळीच सरकारला कोरोना कसा दिसतो? देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

मुंबई - राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाआधी झालेल्या कामगाज सल्लागार समितीच्या बैठकीतून विरोधी पक्ष भाजपने वॉकआऊट केले आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर कडक शब्दात टीका देखील केली आहे.

'कामगाज सल्लागार समितीच्या बैठकीतून आम्ही वॉकआऊट केले आहे. कारण सरकारला कुठल्याही चर्चा करण्यात रस नाही. सरकारने बजेटची प्रोसेससुद्धा पुर्ण न करणे अशा पद्धतीचा प्रस्ताव मांडला आहे.  सरकार अतिशय छोटं आणि कुठल्याही नियमात न बसणारं अधिवेशन घेत आहे, भाजपनेते सुधिर मुंगटीवार यांनी सुचवले की, सरकारला नीट बजेट मांडता येत नसेल तर त्यांनी लेखाअनुदान घ्यावं. कोरोनाची परिस्थिती निवळली की, पुर्ण बजेट मांडावं, परंतु सरकार ते ऐकत नाही. बजेट पासून पळ काढणारं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही झालेलं नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने कामगाज सल्लागार समितीच्या बैठकीतून बहिर्गमन केले आहे'. अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

'अधिवेशनासाठी तुम्हाला कोरोना दिसतो. मग, तुमचे मंत्री 10 - 10 हजाराच्या सभा घेतात. त्याचं काय? नियम फक्त सामान्य मानसांसाठी आहेत तुमच्या मंत्र्यांसाठी नाहीत का? बाहेर सगळ्या मंत्र्यांचे कार्यक्रम सुरू आहेत. पक्षांचे कार्यक्रम सुरू आहेत. मग अधिवेशनातच सरकारला का भिती वाटतेय? बजेटबाबतही सरकारला सविस्तर चर्चा नको आहे. खातेवार चर्चा नको आहे. सरकारला प्रत्येक खात्यात चाललेल्या भ्रष्ट्राचाराची चिरफाड होईल याची भिती वाटत आहे. म्हणून अधिवेशनातून पळ काढण्यात येत आहे.
सरकार आपल्याच आमदार आणि मंत्र्यांना घाबरले आहे, त्यामुळे या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीचा विषयच पटलावर आणलेला नाही'', अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे. सरकार जनतेच्या प्रश्नांपासून कितीही पळ काढत असली तरी, आम्ही हाताशी असलेल्या सर्व संवैधानिक मार्गांचा अवलंब करून जनतचे प्रश्न लावून धरू असे फडणवीस म्हणाले 

------------------------------------------------

politics marathi news update thackray government sees Corona during legislative session political live

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com