ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रदुषण पुन्हा वाढले; कोविड रूग्णांनी ही खबरदारी घेण्याची गरज

मिलिंद तांबे
Tuesday, 10 November 2020

मुंबईत पुन्हा एकदा प्रदुषणाच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसते. दिवाळीच्या सुरूवातीला हवेची गुणवत्ता खालावली आहे

मुंबई, ता. 10 : ऐन दिवाळिच्या तोंडावर मुंबईतील प्रदुषण पुन्हा एकदा वाढल्याचे दिसते. हवेची गुणवत्ता मध्यमपासून वाईट स्तरावर नोंदवली गेली. हवेची गुणवत्ता घसरल्याने श्वसनाचे विकारासह कोविडची संसर्ग वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येतेय.

मुंबईत पुन्हा एकदा प्रदुषणाच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसते. दिवाळीच्या सुरूवातीला हवेची गुणवत्ता खालावली आहे. सफरच्या आकडेवारीनुसार मध्यमस्तरापर्यंत असणारी शहरातील हवेती गुणवत्ता मंगळवारी वाईट स्तरापर्यंत नोंदवली गेली. गेल्या 15 दिवसांत दुस-यांदा हवेची गुणवत्ता ढासळली आहे.

महत्त्वाची बातमी : दाऊदच्या 6 मालमत्ताचा लीलाव; इक्बाल मिरचीच्या मालमत्तांना पुन्हा कोणीही ग्राहक नाही

मुंबई शहरात हवा गुणवत्ता निर्देशांक 221 तर पीएम 2.5 एवढा नोंदवली गेला आहे. चेंबूरमध्ये 324 , माझगांव 309 आणि मालाडमध्ये 308 हवपवा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट पातळीपर्यंत नोंदवला गेला. तर वरळी 69 , भाडूप 166 , बोरिवली 122, अंधेरी 139 हवा गुणवत्तेसह समाधानकारक पातळी नोंदवली गेली. नवी मुंबईतील हवेची पातळी देखील 125 समाधानकारक नोंदवली गेली.

मुंबईत गारवा जाणवू लागला असून रात्री किमान तापमान 20 अंशापर्यंत खाली येतो. काही ठिकाणी धुक्याची चादर पसरलेली दिसते. सकाळी उशिरापर्यंत ही परिस्थिती बघायला मिळते. यामुळे श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता आहे. फुफ्फुसाचे आजार, दमा असणाऱ्या रूग्णांनी काळजी घेण्याची गरज आहे. शिवाय कोविडबाधित किंवा कोविडमुक्त झालेल्या व्याक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे इंडीयन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

pollution in mumbai increased before diwali mumbais air quality is poor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pollution in mumbai increased before diwali mumbais air quality is poor