BMC च्या स्मार्टफोन उपक्रमाचा कोविड -19 रुग्णांवर सकारात्मक परिणाम

BMC च्या स्मार्टफोन उपक्रमाचा कोविड -19 रुग्णांवर सकारात्मक परिणाम

मुंबई  : मुंबई महानगपालिकेने कोविड 19 रुग्णांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी जंबो केअर सेंटर आणि आणि पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये स्मार्टफोनचा वापर करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला रुग्णांनी ही चांगला प्रतिसाद दिला असून आतापर्यंत १० हजारांहून अधिक रुग्णांमध्ये सकारात्मक बदल झाला आहे. स्मार्टफोनद्वारे कुटुंबियांशी सतत संपर्क साधल्यानंतर आतापर्यंत 10,000 हून अधिक रूग्णांनी आरोग्यामध्ये चांगला प्रतिसाद दिला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या रूग्णांमध्ये जलद रिकव्हरी पाहिली आहे. जेव्हा ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलत होते. 

सार्स कोविडच्या संसर्गामुळे कोविड 19 च्या रुग्णांना विलगीकरण वॉर्डात ठेवले जात आहे, जेथे त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना भेटू शकत नाहीत आणि अगदी शेवटच्या दिवसापर्यंत रुग्ण एकटेच राहतात. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले की, कोविड 19 चे रुग्ण विलगीकरण वॉर्डमध्ये उपचार घेत असतांना नैराश्यात जातात. त्यांच्याशी डॉक्टरांशिवाय बोलण्यासाठी कोणीच नसते. यावर उपाय म्हणून पालिकेने 200 स्मार्टफोन खरेदी केले होते. जे कोविड सेंटर्स आणि प्रमुख रुग्णालयांमध्ये पाठवले गेले. ज्याचा वापर रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी केला जात आहे. आम्ही आमच्या पालिका रुग्णालयांमध्ये असे निरीक्षण केले आहे की जे रुग्ण दररोज आपल्या नातेवाईकांशी बोलतात त्यांच्यात बरे होण्याचे प्रमाण चांगले असते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले नसले तरी आमचा विश्वास आहे की यामुळे रुग्णांच्या लवकर रिकव्हरीस मदत होत आहे. यामुळे मृत्यूदरात ही घट होत आहे. मानसोपचारतज्ज्ञ यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामुळे, रुग्णांची मानसिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे असे मत व्यक्त केले आहे. 

रुग्ण, त्यांचे वय किंवा लिंग काहीही असो, त्यांना कोविड -19 चा संसर्ग झाल्यास ते घाबरतात. अशा परिस्थितीत जेव्हा ते दिवसभर एकटे राहतात तेव्हा त्यांना नैराश्य आणि चिंता सतावते.  बर्याच रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतरही तेच दुःख कायम असते. मात्र, जर ते दररोज त्यांच्या कुटूंबियांशी बोलले तर ते त्यांच्या रिकव्हरीस मदत करते, ”असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ हरीश शेट्टी यांनी सांगितले. 

दरम्यान, कोरोना आजारामुळे मानसिक ताणतणावात असलेल्या रुग्णांना स्मार्टफोनमार्फत जंबो सेंटरमध्ये समुपदेशनही केले जात आहे. “ कोविड -19 रूग्णांमध्ये मानसिक ताणतणाव वाढत आहे. गेल्या आठवड्यापासून आम्ही स्वयंसेवक सल्लागार किंवा मानसोपचार तज्ञांच्या मदतीने ऑनलाईन समुपदेशन सुरू केले आहे. शिवाय, प्रत्येक रुग्णाला 45 मिनिटांसाठी समुपदेशन केले जाते.

आम्ही आयसीयूमधील रूग्णांना ही स्मार्टफोन दिला आहे जेणेकरून ते तणावातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलू शकतील, ”असे नेस्को कोविड 91 केंद्राचे प्रभारी डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले.

Positive impact of BMCs smartphone initiative on covid19 patients

--------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com