esakal | महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री 'आदित्य ठाकरे'च ?
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री 'आदित्य ठाकरे'च ?

आदित्य ठाकरेंना शुभेच्छा देणारे पोस्टर्स झळकले मुंबईत. पोस्टर्सवर राज्याचे भावी मुख्यमंत्री असा आदित्य ठाकरेंचा उल्लेख

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री 'आदित्य ठाकरे'च ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वरळी मतदार संघातून निवडून आलेले शिवसेना युवा नेते आमदार आदित्य ठाकरेंना शुभेच्छा देणारे पोस्टर्स झळकले आहेत. या पोस्टर्सवर राज्याचे भावी मुख्यमंत्री असा आदित्य ठाकरेंचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडीत सत्तास्थापनेसाठी शिवसेनेकडून दबाव वाढवला जात असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते, असं भाकीत राजकीय पंडितांनी वर्तवलंय. त्यामुळे शिवसैनिकांची ही इच्छा पूर्ण होणार का? याचीच सर्वांना उत्सुकता लागून आहे. 

मुख्यमंत्री कुणाचा ? 

लोकसभेनंतर भाजप आणि शिवसेनेचं 50-50 चं सूत्र ठरलंय. चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही भाजपची अडचण समजून घेतली. मात्र, भाजपची प्रत्येक अडचण आम्ही समजून घेऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आमचे डोळे उघडलेत. अत्यंत पारदर्शक पद्धतीने जनतेसमोर येऊ. सत्तास्थापनेसाठी वेडेवाकडे निर्णय घेणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

निवडणुकीत हार जीत होत असते. महाराष्ट्राने महायुतीला सत्तास्थापन करण्याएव्हढ्या जागा दिल्यात. ज्या चुका झाल्यात, त्या चुका परत होणार नाही. याची काळजी घेणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. येत्या पाच वर्षात अत्यंत जबाबदारीने काम करणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हंटले. 

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचं अभिनंदन केलंय. विरोधकांनी गेली पाच वर्ष झोपेत घालवली. आता झोपू नका, म्हणजे आमच्यावरचा ताण कमी होईल असंही उद्धव ठाकरे म्हणलेत. 

Webtitle : posters in mumbai claming aaditya thackeray as future CM of maharashtra

loading image
go to top