esakal | दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात शिक्षक संघटनांनी केली 'ही' मोठी मागणी.. वाचा संपूर्ण बातमी 
sakal

बोलून बातमी शोधा

exams

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात येते. परंतु यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नुकसान पाहता आगामी वर्षात दहावी, बारावी परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात शिक्षक संघटनांनी केली 'ही' मोठी मागणी.. वाचा संपूर्ण बातमी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात येते. परंतु यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नुकसान पाहता आगामी वर्षात दहावी, बारावी परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लाँकडाऊनमुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन लेक्चरवर अवलंबून रहावे लागत आहे. ऑनलाइन लेक्चर मधून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन होत नाही. शिक्षण विभागाकडून शाळा टप्याटप्याने सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. 

हेही वाचा: मान्सूनविषयीच्या 'या' १० भन्नाट गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? नक्की वाचा...

15 जूनपासून ऑनलाइन शाळा सुरू करण्याचा विचार प्रशासन करत आहे. परंतु शाळा, महाविद्यालये कधी सुरू होतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येतात. सप्टेंबर मध्ये जरी शाळा, महाविद्यालये सुरू झाली तर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जेमतेम सहा महिनेच मिळतात. त्यामुळे दहावीची परीक्षा मार्च ऐवजी एप्रिल 2021 मध्ये घेण्यात यावी, अशी मागणी मुंबई मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रशांत रेडीज यांनी केली आहे.

बारावीच्या विद्यार्थांचाही अभ्यासक्रम पूर्ण होणार नसल्याने या विद्यार्थांचीही परीक्षा फेब्रुवारी ऐवजी मार्च अखेरीस किंवा एप्रिल महिन्यात घ्यावी, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केली आहे. परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जादा वेळ मिळेल असे संघटनेचे सचिव प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबईत 'या' क्षेत्रांवर झाला लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम...

परीक्षा पुढे ढकलल्यास निकाल लांबण्याची शक्यता नाही. नियामक आणि माँडरेटर्सनी थोडे अधिक परिश्रम घेतल्यास पेपर तपासणीचे काम महिनाभरात पूर्ण होऊन निकाल ठरलेल्या वेळेत लावणे शक्य असल्याचेही ते म्हणाले.

कोरोनामुळे फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये होणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेसाठी अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे. आगामी परीक्षेत पर्यायी प्रश्नांवर भर द्यायला हवा, अशी मागणीही रेडीज यांनी केली आहे.

postpone SSC and HSSC exams teacher organisations seek to government 

loading image
go to top