घरोघरी पुन्हा मातीची भांडी

घरोघरी पुन्हा मातीची भांडी

नवी मुंबई - मॉडर्न किचन म्हटले की त्यात आकर्षक रंगसंगतीतील नॉनस्टीक भांडी आलीच. पण त्यांचे तोटे लक्षात येऊ लागल्याने अनेकांनी पूर्वीची स्टीलची भांडी जवळ केली होती. त्यातही दोन-तीन वर्षांपासून बदल होत असून आरोग्य आणि चवीचा विचार करून मातीची भांडी पुन्हा घरोघरी दिसू लागली आहेत. त्यांच्या खरेदीत तीन वर्षांत ५० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 

स्वयंपाक घरातील भांड्यांपासून विविध वस्तूंमध्ये आधुनिक युगात बदल होत आहेत. २५ ते ३० वर्षे स्टील, ॲल्युमिनिअमच्या भांड्यांचेच स्वयंपाक घरावर राज्य होते. तांब्या-पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी जाणारा वेळ हे या भांड्यांच्या पथ्यावर पडले होते. पण, शोभेसाठी फुलदाण्या, मेणबत्ती स्टॅंड अशा वस्तूंसह पातेले, पाण्याच्या बाटल्या, ग्लास आशा वस्तू अनेकांनी तांब्याच्या ठेवल्या होत्या. आता स्टील आणि तांबे, पितळ्याच्या भाड्यांच्या स्पर्धेत मातीची भांडीही दिसू लागली आहेत. 

मातीचा फ्रीज, तवा, दीड किलोपासून अर्धा किलोपर्यंतचे पदार्थ शिजवू शकणारी हंडी, कढई, कुकर अशा वस्तू छान आकारात आणि लाल आणि काळ्या रंगात बाजारात आहेत. मोठमोठ्या प्रदर्शनांमध्येही ती हमखास पाहण्यास मिळतात. तेथे ३०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत आहेत.  तवा १२० रुपयांना मिळतो; तर एका प्रसिद्ध कंपनीनेही मातीची भांडी १२०० रुपयांपासून विकण्यास सुरुवात केली आहे. गुजरातमधीलही एक प्रसिद्ध कंपनी अशी भांडी २० रुपयांपासून साडे पाच-सहा हजार रुपयांपर्यत विकत आहे. 

मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्याने कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, सल्फर हे घटक मिळतात. आम्लपित्ताची पातळी वाढत नाही. पौष्टिक घटक नष्ट होत नाहीत. तेलाचा वापरही कमी होतो. त्यामुळे ती योग्य आहेत.
- डॉ. कृष्णा खडके, आहारतज्ज्ञ

मातीची भांडी सोयीच्या दृष्टीने मागे पडली होती. आता पुन्हा स्वादिष्ट आणि पौष्टिक आहारासाठी गृहिणी मातीची भांडी वापरू लागल्या आहेत. त्यामध्ये तीन वर्षांत सुमारे ५० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. 
- श्रुती जोशी, विक्रेती

आरोग्यास हितकारक
ॲल्युमिनिअमच्या भांड्यात पदार्थ शिजवल्याने त्यातील ८७ टके पोषक तत्व नष्ट होतात. पितळ्याच्या भांड्यात अन्न शिजवल्याने सात टक्के पोषकद्रव्ये कमी होतात. मातीच्या भांड्यातील पदार्थांमध्ये मात्र १०० टक्के पोषण कायम राहते, असे जाणकार सांगतात.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com