Tata Power : घरगुती वीज बिलात होणार ६०% पेक्षा जास्त बचत

ऊर्जेची बचत करणाऱ्या मोशन सेन्सर आणि सेन्सर लाईट्स त्यांच्या परिसरात कोणी मनुष्य उपस्थित आहे का? ते ओळखू शकतात आणि त्यानुसार आवश्यक प्रकाश देतात.
tata power
tata powersakal

मुंबई - मुंबई शहराला अविरत वीजपुरवठा करत असताना अक्षय ऊर्जा स्रोतांना देण्यासाठी टाटा पॉवरने ऊर्जेचा वापर कमी करण्यात आणि स्मार्ट व शाश्वत जीवन जगण्यात मदत करणारी ऑटोमेशन सोल्युशन्स उपलब्ध करवून देऊन ऊर्जा बचतीत योगदान देण्याचे ठरवले आहे.

या उपकरणांच्या वापरामुळे मुंबईतील ग्राहकांसाठी या लाईट्स वीज बिलात ६०% पेक्षा जास्त आणि एकंदरीत ऊर्जेमध्ये दरवर्षी ८,१२,००० केडब्ल्यूएचची बचत करू शकतात.

सेन्सर बेस्ड डिमेबल एलईडी लाईट

टाटा पॉवरच्या माध्यमातून मुंबईतील विविध निवासी गृहसंकुले, टाऊनशिप्स, मॉल्स आणि इन्फिनिटी मॉल, ताज वेलिंग्टन यासारखी अतिशय लोकप्रिय ठिकाणे आता टाटा पॉवरने सेन्सर-बेस्ड एलईडी स्मार्ट लाईट्स इन्स्टॉल केले असल्याने अधिक स्मार्ट झाली आहेत.

विवारिया काँडोमिनियम, रहेजा आर्टेशिया आणि सिम्प्लेक्स सोसायटी यासारख्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये अत्याधुनिक सेन्सर बेस्ड डिमेबल एलईडी लाईट सोल्युशन्स लावण्यात आल्याने त्यांचे रूपांतर स्मार्ट स्पेसेसमध्ये झाले आहे.

मोशन सेन्सर आणि सेन्सर लाईट्स

इमारतीच्या खोल्यांमध्ये, जिन्यांवर आणि पार्किंग लॉट्स येथे हे स्मार्ट एलएडी वापरता येऊ शकतात. वायफाय पीआयआर मोशन सेन्सर १० ए रीले स्विच, सेन्सर एलईडी माउंट ट्युपलिप, १२ डब्ल्यू आर आणि टी५ सेन्सर एलईडी ट्यूब १८ डब्ल्यू या लाईट्स आहेत.

ऊर्जेची बचत करणाऱ्या मोशन सेन्सर आणि सेन्सर लाईट्स त्यांच्या परिसरात कोणी मनुष्य उपस्थित आहे का? ते ओळखू शकतात आणि त्यानुसार आवश्यक प्रकाश देतात. ही अप्लायन्सेस इन्स्टॉल करणे सोपे आहे आणि आवश्यकता नसताना लाईट्स बंद राहत असल्याने ऊर्जेची व परिणामी खर्चाची खूप बचत होते.

टाटा पॉवर ईझी होम

टाटा पॉवर ईझी होम ही देखील एक आयओटीवर आधारित सुविधा आहे जिचा वापर करून ग्राहक त्यांच्या घरांमध्ये ऊर्जेचा सक्षमतेने वापर करून खर्चात बचत करू शकतात. यामध्ये स्वतःच्या वीज वापरावर लक्ष ठेवता येते. प्रत्येक उपकरणांसाठी, प्रत्येक खोलीत आणि एकंदरीत घरात किती वीज वापर होत आहे त्याचे ट्रॅकिंग केले जाऊ शकते.

ईझी होम ऑटोमेशन सोल्युशन्सच्या सहाय्याने ग्राहक त्यांची उपकरणे फोनमार्फत किंवा व्हॉइस कमांड्समार्फत ऑपरेट करू शकतात. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती असलेल्या घरांसाठी हे खूप उपयुक्त ठरू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com