सत्ता महाविकास आघाडीची परंतु नेतृत्व शिवसेनाच करणार - संजय राऊत

तुषार सोनवणे
Sunday, 25 October 2020

आगामी निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीचाच विजय होईल आणि शिवसेना त्याचे नेतृत्व करने असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणूका कोरोनामुळे लांबणीवर पडल्या आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आगामी निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीचाच विजय होईल आणि शिवसेना त्याचे नेतृत्व करने असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचा आज दसरा मेळावा, मुख्यमंत्री कोणाकोणावर बाण चालवणार?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी बृहृन्मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येईल , या आघाडीचे नेतृत्व शिवसेनाच करेन असे संजय राऊत यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.

चला आजपासून व्यायामाला करा सुरुवात; जिम, व्यायामशाळा सुरु

आज शिवसेनेचा दसरा मेळावा संपन्न होणार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. कोरोनाचे संकट नसते, राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवाजी पार्कवर आले असते. आज पक्षप्रमुख जे बोलतील त्याकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे असे संजय राऊत यांनी यावेळे म्हटले.

Power will be led by Mahavikas Aghadi but Shiv Sena will lead - Sanjay Raut

-------------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power will be led by Mahavikas Aghadi but Shiv Sena will lead - Sanjay Raut