Powercut: मुंबईतील तीनही रेल्वे मार्गावरील सेवा पुर्वरत; प्रवाशांना दिलासा

प्रशांत कांबळे
Monday, 12 October 2020

दुपारी 12ः30 नंतर वीजपुरवठा काहीप्रमाणात सुरळीत करण्यात आला. त्यानंतर तीनही रेल्वे मार्गावरील उपनगरीय सेवा पुर्वरत झाली.

मुंबई - मुंबईत  महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने  मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित झाला होता. त्याच्या परिणाम मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेवर झाला होता. त्यानंतर आता रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे.

मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील वीज पुरवठा सकाळी 10 वाजेच्या सुमारास खंडीत झाला. त्यामुळे तीनही मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा देखील ठप्प झाली होती. रेल्वे सेवा ठप्प झाल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे हाल झाले. दुपारी 12ः30 नंतर वीजपुरवठा काहीप्रमाणात सुरळीत करण्यात आला. त्यानंतर तीनही रेल्वे मार्गावरील उपनगरीय सेवा पुर्वरत झाली.

 

पश्चिम रेल्वे अपडेट (दुपारी 12ः40)

पश्चिम रेल्वे मार्गावर 10.5 चर्चगेट - वसई लोकल रेल्वे मार्ग ठप्प झाला होता.दरम्यान वसई ते बोरिवली दरम्यान महापारेशन वीज पुरवठा असल्याने वसई- बोरिवली दरम्यानची लोकल सेवा सुरळीत सुरू होती. दरम्यान चर्चगेट ते वसई दरम्यानची लोकल सेवा सुमारे 12.30 च्या दरम्यान पूर्ववत सुरु करण्यात आली असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

 

मध्य रेल्वे मेन लाईन अपडेट ( दुपारी 12ः30 )

12.26 वाजता मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईन सुरू करण्यात आली आहे.मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली.

 

हार्बर रेल्वे अपडेट ( दुपारी 12ः00)

मध्य रेल्वे मार्गावर 10.5 मिनिटाने बंद पडलेली हार्बर रेल्वे मार्ग आता 10.55 वाजताच्या दरम्यान हार्बर रेल्वे सेवा पुर्ववत सुरू करण्यात आली आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Powercut Service on all three railway lines in Mumbai Comfort to the passengers