esakal | 200 रुपयांचे पीपीई किट 1500 ते 2000 रुपयांना; खासगी रुग्णालयांची लुटमार थांबेना; नागरिक करताहेत आरोग्यमंत्र्यांना ट्वीट
sakal

बोलून बातमी शोधा

200 रुपयांचे पीपीई किट 1500 ते 2000 रुपयांना; खासगी रुग्णालयांची लुटमार थांबेना; नागरिक करताहेत आरोग्यमंत्र्यांना ट्वीट
  • पीपीई किटच्या किंमतीवर ट्विट
  • कल्याण डोंबिवलीतील रुग्णालयांच्या मनमानीवर जोरदार चर्चा 

200 रुपयांचे पीपीई किट 1500 ते 2000 रुपयांना; खासगी रुग्णालयांची लुटमार थांबेना; नागरिक करताहेत आरोग्यमंत्र्यांना ट्वीट

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज


ठाणे - कोरोना संक्रमण काळात खासगी रुग्णालये रुग्णांकडून भरमसाठ बिल आकारत आहेत. पालिका प्रशासनाकडून अशा रुग्णालयांवर कारवाई होत असली तरीही हे प्रकार काही थांबलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहूल घुले यांनी पीपीई किटसंदर्भात एक ट्विट् केले आहे. पीपीई किटची किंमत आजच्याघडीला 200 रुपये असताना, रुग्णालये त्यासाठी रुग्णाकडून 1500 ते 2000 रुपये आकारत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विट्मध्ये म्हटले आहे. या ट्विट्ला अनेकांनी रिट्विट करीत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना टॅग केले आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये रविवारी फेसबुक आणि ट्विटरवर याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे.

ऑडीचा कारनामा ; उंदीर पळवण्यासाठी लावले तब्बल 50 हजाराचे यंत्र; झाले मात्र उलटेच

ठाणे, कल्याण आणि डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. रुग्णांना उपचारासाठी बेड मिळालाच तर खासगी रुग्णालयांकडून आकारले जाणाऱ्या बिलांवरील आकडे पाहून रुग्णांच्या पायाखालची जमिनच सरकत आहे. महापालिका प्रशासनाने रुग्णालयातील केवळ बेडचे चार्जेस निश्चित केले आहेत. रुग्णालये पीपीई कीट, कोविड व्यवस्थापन आणि अन्य चार्जेसच्या नावाखाली ही महागडी बिले रुग्णांना आकारत आहेत. नुकतेच कल्याणमधील श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या बिलात पीपीई किटसाठी 49 हजार 500 रुपये व उपचारासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी साडेसहा हजार रुपये आकारण्यात आल्याची घटना ताजी आहे. अशा सर्व घडामोडींना अनुसरुनच डॉ. राहूल घुले यांनी शनिवारी एक ट्विट केले यामध्ये त्यांनी पीपीई किटची किंमत ही 200 रुपये असताना रुग्णालये त्यासाठी पंधराशे ते दोन हजार रुपये आकारत असल्याचे सांगितले. पीपीई किटच्या या किंमतीवरुन समाज माध्यमावर याविषयी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

अशी मिळणार रायगडकरांना अत्याधुनिक जलद आरोग्य सेवा

कल्याण डोंबिवलीत चर्चा
कल्याणमधील श्रीदेवी हॉस्पिटलने एका रुग्णाला आकारलेले 97 हजाराचे बिल ही घटना ताजी असल्याने डॉ. घुले यांच्या ट्विटची रविवारी एकच चर्चा समाज माध्यमावर सुरु झाली. अनेकांनी डॉ. घुले यांचे ट्विटर अकाऊंट चेक करीत त्यावरील माहिती जाणून घेतली. यामध्ये तीन दिवसांपूर्वी डॉ. घुले यांनी केलेले ट्विट रिट्विट करण्यास नागरिकांनी सुरुवात केली आहे. याट्विटमध्ये डॉ. राहूल यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये कोणाही गरजू कोरोना बाधित रुग्णाला उपचाराची तत्काळ आवश्यकता असल्यास त्यांच्यावर पाटीदार भवन येथील वन रुपी क्लिनिकच्या रुग्णालयात उपचार केले जातील असे म्हटले आहे.  

पीपीई किटची किंमत 200 रुपये असताना रुग्णालये त्यांच्या पद्धतीने रुग्णांकडून भरमसाठ चार्ज घेत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना हे परवडणारे नाही. रुग्णालयांनी अशा पद्धतीने बिल आकारणे चुकीचे असल्याचे वाटते, त्यामुळेच हे ट्विट केले आहे. नागरिकांनीही याविषयी सजग झाले पाहीजे. डोंबिवलीत वन रुपी क्लिनिक व महापालिका प्रशासनाच्या सहाय्याने 500 बेडचे कोविड रुग्णालय असून यामध्ये 100 ऑक्सिजन बेड आहेत. 

डॉ. राहूल घुले, संचालक वन रुपी क्लिनिक 

मनसेचा इशारा
कल्याण डोंबिवलीतील खासगी रुग्णालये रुग्णांकडून भरमसाठ बिल आकारत असून पालिका प्रशासनाचाही त्यांच्यावर वचक नाही. रुग्णालयांनी वेळीच सुधारावे अशा इशारा हे ट्विट समाज माध्यमावर व्हायरल करीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिला आहे.

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image