esakal | प्रभादेवीमध्ये केंद्र सरकारविरोधात शिवसेनेचे गाजर आणि लॉलीपॉप आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभादेवीमध्ये केंद्र सरकारविरोधात शिवसेनेचे गाजर आणि लॉलीपॉप आंदोलन

 मोदी सरकार विरोधात शिवसेनेच्या वतीने दादरमध्ये गाजर आणि लॉलीपॉप आंदोलन करण्यात आले.

प्रभादेवीमध्ये केंद्र सरकारविरोधात शिवसेनेचे गाजर आणि लॉलीपॉप आंदोलन

sakal_logo
By
रजनीकांत साळवी

मुंबई: केंद्र सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या नव्या करवाढीमुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ होणार आहे. त्यामुळे  सामान्य जनतेचे जगणे मुश्कील होत चालले आहे याच्या निषेधार्थ अच्छे दिनचे लॉलीपॉप दाखविणाऱ्या मोदी सरकार विरोधात शिवसेनेच्या वतीने दादरमध्ये गाजर आणि लॉलीपॉप आंदोलन करण्यात आले.

शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत यांच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये आंदोलन करण्यात आले यावेळी नागरिकांना लॉलीपॉप गाजर देत शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे.आज शिवसेनाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. दादर येथे प्रत्येक शाखेच्या वतीने रॅली काढण्यात आली.  अच्छे दिनचे लॉलीपॉप दाखवणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध अशा आशयाचे फलक घेऊन शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केंद्र सरकारच्या विरोधात केली.

हेही वाचा- 'केंद्र सरकारच्या पापाचे घडे भरले, त्यांना धडा शिकवा', शिवसेनेची निदर्शने

पेट्रोल आणि डिझेल दरवाढ ही अत्यंत चुकीची आहे केंद्र सरकारने हेच दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

prabhadevi shivsena protest fule price hike modi government Carrot protest

loading image
go to top