आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा; संकेतस्थळावर शिल्लक असणाऱ्यांची यादी 

तेजस वाघमारे
Sunday, 25 October 2020

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बी.ए व बी.कॉमच्या परीक्षा सोमवारपासून (ता.26) ऑनलाईन सुरू होत आहेत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बी.ए व बी.कॉमच्या परीक्षा सोमवारपासून (ता.26) ऑनलाईन सुरू होत आहेत. या परीक्षेपूर्वी रविवारी (ता.25) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पुन्हा सराव परीक्षा घेण्यात येणार आहे. या सराव परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे. 

अर्णब गोस्वामी पुन्हा गैरहजर! "कारणे दाखवा'साठी पोलिसांत येणे टाळले

20 ऑक्‍टोबरपासून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सराव परीक्षा सुरू झाल्या असून, आतापर्यंत पाच सराव परीक्षा झाल्या आहेत. याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी होणाऱ्या सराव परीक्षेसाठी काही विद्यार्थ्यांना ई-मेलवर सराव परीक्षेची लिंक मिळाली असून, ते अजूनपर्यंत सराव परीक्षेस बसले नाहीत. अशा विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर व आयडॉलच्या लिंकवर टाकण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांसाठी ही सराव परीक्षा देणे आवश्‍यक आहे. सराव परीक्षेमुळे अंतिम परीक्षा देण्यास कोणतीही अडचण येत नाही.

केडीएमसीच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पांचा वेग थंडावला! लोकप्रतिनिधींची नाराजी

अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीए व बीकॉमच्या विद्यार्थ्यांसाठी ही सराव परीक्षा शेवटची असेल, असे आयडॉलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिलेली नाही. त्यांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकली आहे. विद्यार्थ्यांनी या यादीत नाव पाहून संकेतस्थळावर दिलेल्या 10 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. 

Practice exams for Idol final year students List of on the website

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Practice exams for Idol final year students List of balances on the website