राजीनाम्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा निवडणूकीच्या रिंगणात

pradip sharma
pradip sharma

ठाणे : उत्तर भारतीयांची निर्णायक मते लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपमधील स्थानिक इच्छुकांची चिंता वाढली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे राजेंद्र गावीत निवडून आले आहेत. त्यांनी नालासोपारा मतदारसंघातून 26 हजारहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या मतदारसंघावर दावा ठोकण्याची शिवसेना नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून याठिकाणी तगडा उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून त्यासाठी प्रदीप शर्मा यांच्यासाठी शिंदे यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

प्रदीप शर्मा यांनी चार जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा पोलीस महासंचालकांकडे पाठविला आहे. शर्मा यांनी स्वेच्छा निवृत्त घेतली असली तरी अद्याप ठाणे पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com