
उल्हासनगर : मागच्या महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव देण्यात यावी तसेच दिव्यांगांना मासिक 6 हजार रुपये मानधन मिळावे यासाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यामधील सत्ताधारी आमदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते.आता बच्चू कडू यांनी धर्मविर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती पर्वावर 14 मे रोजी महाराष्ट्रातील सर्व कॅबिनेट व राज्यमंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करण्याचे जाहीर केले असून तसे आदेश त्यांनी जिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख,शहरप्रमुख यांना दिले आहेत.या आदेशान्वये उल्हासनगरात राहणारे प्रहारचे ठाणे जिल्हा प्रमुख ॲड.स्वप्निल पाटील हे ठाण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.