
पारगाव : आंबेगाव येथील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील प्रमोद ज्ञानेश्वर ढोबळे या तरुणाची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने परिसरात त्याचे कौतुक होत आहे. पारगाव सारख्या ग्रामीण भागातील प्रमोद ढोबळे या शेतकरी कुटुंबातील तरुणाने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.