esakal | प्रताप सरनाईकांची उच्च न्यायालयात धाव
sakal

बोलून बातमी शोधा

प्रताप सरनाईकांची उच्च न्यायालयात धाव

प्रताप सरनाईकांची उच्च न्यायालयात धाव

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

मुंबई - मनी लॅान्ड्रींगच्या आरोपात अडचणीत आलेल्या शिवसेनेच्या आमदार प्रताप सरनाईक(Pratap sarnaik) यांनी अटकेपासून बचाव करण्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयात(High Court) याचिका(Petition) दाखल केली आहे. मंगळवारी तातडीने याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.(Pratap sarnaik wants justice in money laundering from high court)

नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (एन एस ई एल)

प्रकरणात चालू वर्षी एप्रिल महिन्यात विकासक योगेश देशमुख यांना अटक करण्यात आली होती. सुमारे 5,500 कोटींचा सावकारी संबंधित आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. देशमुख सरनाईक यांचे निकटवर्तीय आहेत असे सांगितले जातंय.आस्था समूहाने काळ्या यादीतील काही कंपन्याशी व्यवहार करून सुमारे अडिचशे कोटींचा गैरव्यवहार केला आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील ग्रामीण आरोग्य सुविधांचा आढावा

सरनाईक यांच्या विहंग ग्रुहनिर्माण कंपनीने एक ग्रुहनिर्माण प्रकल्प सुरू केला होता. यासाठी टिटवाळा मध्ये काही जमिनी खरेदी केल्या होत्या. मात्र सुमारे बावीस कोटी रुपयांच्या या व्यवहारात फसवणूक केली असा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये देशमुख आणि सरनाईक यांच्या खात्यात पैसे वळविले असा आरोप केला जात आहे. ईडीने सन 2014 मध्ये भूखंड ताब्यात घेऊन सर्व व्यवहार थांबविले आहेत. मात्र आता हा भूखंड पुन्हा विक्रीला काढल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पुन्हा ईडीने तपास सुरू केला आहे. यामध्ये अटक होऊ नये म्हणून सरनाईक आणि विहंग, पूर्वेश आणि योगेश चांडेल यांनी याचिका केली आहे.

यापूर्वी सुरक्षा रक्षकांच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. उद्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top