esakal | प्रथम संस्थेचा ५० गावांमध्ये नवोपक्रम: विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे | Education training
sakal

बोलून बातमी शोधा

education training

प्रथम संस्थेचा ५० गावांमध्ये नवोपक्रम: विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील ५० गावांमध्ये कोरोनाच्या कालावधीपासून प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या (pratham education foundation) स्वयंसेवकांमार्फत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे (education training) देण्यात येत आहेत. विद्यार्थांचे (students) शैक्षणिक नुकसान होऊ नये व गावात शैक्षणिक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक गावातून युवक-युवती, माता-पालक यांची निवड करून स्वयंसेवक (volunteers) नेमण्यात आले.

हेही वाचा: म्हाडाच्या स्वीकृत अर्जांची अंतिम यादी ९ ऑक्टोबरला

त्यांना भाषा आणि गणित विषयांचे तसेच रेडीनेस कॅम्प याविषयी प्रशिक्षण प्रत्यक्ष व झूम कॉलद्वारे देण्यात आले. प्रत्यक्ष गावोगावी, प्रत्येक पाड्यात स्वयंसेवक वर्ग १ ते २ तास तेथील सोयीनुसार घेण्यात येत आहेत. गावातील मुलांना भाषा विषयात चित्रावरून गोष्ट तयार करणे, चौदाखडी वाचन, खेळ, विविध विषयांवर लेखन करता येणे तसेच मुलांना मनोरंजन पद्धतीने खेळ घेण्यात येत आहेत.

गणित विषयामध्ये संख्या वाचन, बेरीज-वजाबाकी, वस्तूंच्या साह्याने अभ्यास घेणे, त्याचबरोबर आकारांची ओळख, खेळ, इत्यादी घटक घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना प्रथमचे प्रशांत गवळे, लक्ष्मण हाडळ तसेच इतर सहकारी यांच्या मार्गदर्शनाने सर्व गावांत स्वयंसेवक वर्ग घेत आहेत.

loading image
go to top