वसई-विरारच्या महापौरपदी प्रवीण शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी प्रवीण शेट्टी यांची बिनविरोध निवड झाली.

वसई (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी प्रवीण शेट्टी यांची बिनविरोध निवड झाली. माजी महापौर रूपेश जाधव यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर फक्त एकच नामनिर्देशन अर्ज आल्याने शेट्टी यांची महापौरपदी बिनविरोध निवड होणार हे नक्की झाले होते. आज त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत व महापौरपदी प्रवीण शेट्टी यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. वसई-विरार शहराचे पाचवे महापौर बनण्याचा बहुमान त्यांना मिळाला. या वेळी प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, रमेश मनाले, प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकूर, माजी महापौर रूपेश जाधव, उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, माजी महापौर नारायण मानकर, उमेश नाईक आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Praveen Shetty has newly appointed on Vasai-virar's New Mayor