
राज्यात होणा-या बालमृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे 'प्री मॅच्युअरीटी' आणि 'लो बर्थ वेट'मुळे होत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी झालेल्या एकूण बालमृत्यूंपैकी 24 टक्के मृत्यूं हे वरील कारणांमुळे झाले आहेत.
मुंबई : राज्यात होणा-या बालमृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे 'प्री मॅच्युअरीटी' आणि 'लो बर्थ वेट'मुळे होत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी झालेल्या एकूण बालमृत्यूंपैकी 24 टक्के मृत्यूं हे वरील कारणांमुळे झाले आहेत. आरोग्य विभागाने सादर केलेल्या बालमुत्यू अन्वेषण अहवालात बालमुत्यूंची विविध कारणं नोंदवण्यात आली आहेत.
राज्यात होणा-या अर्भक व बालमृत्युंचे अन्वेषण वैद्यकीय अधिका-यांमार्फत करण्यात आले आहे. बालमुत्यू अन्वेषणामुळे कोणत्या आजार अथवा रोगांमुळे बालमुत्यू होतात याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात सन 2019-20 मध्ये 14208 बालमृत्यू नोंदवण्यात आले,त्यांपैकी 12268 बालमृत्यूंची चौकशी करण्यात आली. तर 2020-21 (ऑक्टोबर पर्यंत ) 7981 बालमृत्यू नोंदवण्यात आले,त्यांपैकी 6946 बालमृत्युंची चौकशी करण्यात आली.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यात 13 प्रकारच्या आजार किंवा कारणांमुळे बालमृत्यू होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार 2020 मध्ये सर्वाधिक म्हणजे 24 टक्के बालमृत्यू हे 'प्री मॅच्युरिटी' आणि 'लो बर्थ वेट'मुळे झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सन 2019 मध्ये हे प्रमाण 23 टक्के इतके होते. त्याखालोखाल बर्थ ऍस्पिक्सीया,आरडीएस,कंजिनिटल मालफॉर्मेशन, सेप्सिस,न्यूमोनिया या आजारांमुळे बालमुत्यू होत आहेत.
बालमत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाने अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यातील ग्रामिण व शहरी भागात जंतूनाशक व जिवनसत्व 'अ' मोहिम सुरू करण्यात आली आहे. बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी अर्भक व नवजात बालकांच्या स्तनपानाबाबत समुपदेशन व प्रशिक्षण दिले जाते.
अर्भक मृत्यूच्या प्रमाणामध्ये 63 % प्रमाण है नवजात शिशु मृत्युचे असते. अर्भक मृत्युदर कमी करण्यासाठी विशेषतः आदिवासी भागातील नवजात बालकांची आशांद्वारे गृहभेटी दरम्यान घरच्या घरी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील आदिवासी प्रवण जिल्हयांसाठी 'इंटेंसीटीफाईड एचबीएनसी' कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश आशांद्वारे 1 वर्षापर्यंतच्या बालकांना गृहभेटी देऊन त्यांचे योग्य वेळेत पुरक आहार सुरु करण्यासाठी माता व कुटुंबियांचे समुपदेशन करुन कुपोषणापासून वाचविण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातील 78 आदिवासी तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबविला जात आहे.
'आ देखे जरा किसमे कितना है दम'! ईडीच्या समन्सनंतर संजय राऊतांचा विरोधकांना इशारा
बालमृत्यू अन्वेषण अहवालानुसार कारणनिहाय झालेले बालमृत्यू
क्र कारणं 2019-20 % 2020-21 %
1)प्री मॅच्युअर आणि एलबीडब्ल्यू 3295 23 1916 24
2)बर्थ ऍस्पिक्सीया 1580 11 930 12
3)सेप्सीस 1363 10 571 7
4)आरडीएस 1341 9 790 10
5)कंजीनिटल मानफॉर्मेशन 1180 8 787 10
6)न्युमेनिया 891 6 560 7
7)अज्युरी-एक्सीडेंट 270 2 152 2
8)ड्रॉविंग 104 1 127 2
9)बाईट्स-पॉयझनिंग 144 1 89 1
10)एयआयडीएस 215 2 62 1
11)मेनिंगिटीस 152 1 93 1
12)डायरिया 31 0 31 0.4
13)इतर आजार 3642 26 1873 23
.................
एकूण 14208 100 7981 100
Pre-maturity and low birth weight increase child mortality in 2020 compared to 2019
--------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )