esakal | मुंबईत गर्भाशयात अर्भक मृत्यूचे प्रमाणात दुप्पट; गर्भवती महिलांनो लसीकरण करा | Corona Vaccination
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine pregnancy women

मुंबईत गर्भाशयात अर्भक मृत्यूचे प्रमाणात दुप्पट; गर्भवती महिलांनो लसीकरण करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दुसऱ्या कोविड लाटेत (Corona second wave) मुंबईत स्टील बर्थ म्हणजेच गर्भातच अर्भकाच्या मृत्यूचे (Infant Death) प्रमाण दुप्पट झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्टील बर्थचे प्रमाण १४.६ टक्के होते, दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण ३४.८ टक्क्यांवर गेल्याचे राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य संशोधन संस्थेने (NIRRH) केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी गर्भवतींनी (pregnant women) लसीकरणाकडे (corona vaccination) दुर्लक्ष करू नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाची सिनेट वादळी ठरणार?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान गर्भवती महिलांमधील लक्षणे तीव्र स्वरूपाची नोंदवली गेली. तसेच त्यांच्यात आयसीयूमध्ये दाखल होण्याचे प्रमाणही जास्त होते. त्याचा थेट परिणाम गर्भावर होतो का, याबाबत अभ्यास करण्यात आला. अर्भकाचे वजन ५०० ग्रॅमपर्यंत असेल, माता ही २२ आठवड्यांची गर्भवती असेल आणि अर्भकाचा गर्भातच मृत्यू झाल्यास त्याला वैद्यकीय भाषेत स्टील बर्थ म्हणतात. स्टील बर्थची संख्या प्रत्येक हजार जन्मानुसार मोजण्यात येतो. दुसऱ्या लाटेते हे प्रमाण ३४.८ टक्के, तर पहिल्या लाटेत १४.६ टक्के होते.

उच्च रक्तदाब, अॅनिमियाचाही त्रास

ज्या महिलांमध्ये स्टील बर्थचे प्रमाण जास्त होते, त्यांना अॅनिमिया, तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास होता. गर्भारपणामधील उच्च रक्तदाबाचे प्रमाण दुसऱ्या लाटेमध्ये २५ टक्के, तर पहिल्या लाटेत ८.३ टक्के होते. गर्भवती महिलांना कोविड झाल्यास स्टील बर्थ होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लसीकरण झाल्यास हा धोका टाळला जाऊ शकतो. त्यासाठी सरकारने त्यांचे समुपदेशन करून त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन ‘एनआयआरआरएच’चे संशोधक डॉ. राहुल गजभिये यांनी केले.

"दुसऱ्या लाटेतील गर्भवतींना श्वास घ्यायला त्रास, ऑक्सिजन पातळी कमी होणे आदी लक्षणे होती. स्टील बर्थला कोविड हा पूर्णपणे जबाबदार आहे, असे म्हणू शकत नाही, मात्र दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएन्टमुळे स्टील बर्थ झाल्याचे समोर आले आहे."
- डॉ. राहुल गजभिये, संशोधक, एनआयआरआरएच.

loading image
go to top