
मोखाडा : मोखाड्यातील जोगलवाडी येथील अविता कवर या गर्भवती महिलेस वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने, तिला आपल्या बाळाला गमवावे लागले. या घटनेची दखल घेत खासदार डॉ. हेमंत सवरांनी शनिवारी तर आमदार हरिश्चंद्र भोये यांनी रविवारी या पीडीत कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे. तसेच या कुटुंबाच्या घराची दयनीय अवस्था बघून, या कुटुंबाला तातडीने जनमन योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत.