मुंबईत ‘हिज फादर्स व्हॉईस’चा प्रीमियर सोहळा

मुंबईत ‘हिज फादर्स व्हॉईस’चा प्रीमियर सोहळा


मुंबई : वडील आणि मुलाच्या हळव्या नात्याची गोष्ट सांगणाऱ्या तसेच जागतिक पातळीवर गौरवलेले लेखक-दिग्दर्शक कार्तिकेयन किरुभाकरन यांच्या ‘हिज फादर्स व्हॉईस’ या इंग्रजी चित्रपटाचा प्रीमियर सोहळा गुरुवारी (ता. ६) गिरगाव येथील रॉयल ऑपेरा हाऊस येथे होणार आहे. इंग्रजीसह तब्बल १० भाषांत निर्मिती केलेल्या या चित्रपटाचा प्रथमच मुंबईत सोहळा होणार आहे. या स्पेशल स्क्रीनिंगसाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ही बातमी वाचा ः 16 फेब्रुवारीला कामोठ्यात "चला हवा येऊद्या"
‘कावडी प्रॉडक्‍शन’च्या बॅनरखाली अश्‍विनी प्रतापराव पवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निसर्गरम्य वातावरणातील नृत्यालयात घडणारी ही कथा आहे. बासरी, गिटार, नृत्य व अभिनय असे अनेक फ्युजन असलेला हा चित्रपट वेगळी अनुभूती देणारा आहे. यात पार्वती ही मुख्य व्यक्तिरेखा अश्‍विनी पवार यांनी साकारली आहे. त्या म्हणाल्या, की माझा हा पहिलाच प्रयत्न आहे आणि तो जर चांगला झाला असेल तर त्याला कारण आमचे दिग्दर्शक. त्यांनी माझ्यातील अभिनेत्री आणि निर्माती म्हणून माझ्या क्षमतांवर विश्‍वास ठेवला. अश्‍विनी पवार यांच्याबरोबरच पी. टी. नरेंद्रन, ज्युलिया कोच, जेरेमी रोस्को, सुधर्मा वैथीयंतन, ख्रिस्तोफर गुरुसामी या कलाकारांनीही काम केले आहे. या चित्रपटाची कथा नृत्यातून हळुहळू उलगडणारी आहे.
 या चित्रपटात एक मराठमोळे गाणे आहे आणि ते गाणे लिहिले आहे नीता पाटील यांनी. तरल आणि सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभले आहे. ती बाजू सांभाळली आहे संगीतकार वेदांत भारद्धाज यांनी. या वेळी चित्रपट संपल्यानंतर कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी www.insider.in या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी लागेल. काही ठराविक आसने राखीव ठेवण्यात आली आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.

कौटुंबिक नातेसंबंधांची कथा उलगडणारा प्रवास
एकमेकांना समजून घेतल्याशिवाय कुटुंबातील नातेसंबंधांना अर्थ उरत नाही. हाच धागा दिग्दर्शक कार्तिकेयन यांनी कथा व पटकथा मांडताना पकडलेला आहे. चित्रपटाच्या एकूणच प्रवासाबद्दल कार्तिकेयन म्हणतात, की उत्तर रामायण आणि आजच्या काळातील नात्यातील तणाव यांचा मेळ घालत मी ही कथा लिहिली आहे. चित्रपटातील सर्व कलाकार नवे आहेत; मात्र त्यांच्यातील कला आणि व्यक्तिमत्त्वाचा उपयोग करून मी त्यांच्याकडून काम करून घेतले. अश्‍विनी पवार म्हणाल्या, की मी नृत्य आणि चित्रकलेच्या क्षेत्रात काम करते आणि माझी भूमिका ही तशीच असल्याने साकारणे सोपे गेले. अभिनयाचा हा पहिलाच अनुभव खूप शिकवणारा आणि अविस्मरणीय होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com