esakal | 6 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची तयारी ; संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे खबरदारी | Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen cylender

6 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची तयारी ; संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे खबरदारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविडची तिसरी लाट येणारच असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तिसरी लाट आलीच तर त्यासाठी ऑक्सिजन ची गरज देखील वाढण्याची शक्यता आहे. ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून राज्यभरात 6 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची तयारी करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंग यांनी सांगितले.

कोविड च्या दुसऱ्या लाटेत 2 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन लागला होता. तिसरी लाट आली तर रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढली तर ऑक्सिजन ची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यभरात ऑक्सिजनची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू आहे.

सध्या राज्यात 1700 ते 1800 ऑक्सिजन ची मागणी आहे. तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येत आहे. शिवाय 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन चे मोठे प्रकल्प तयार करण्यात येत असून त्यामाध्यमातून राज्यात 6 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन ची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती परिमल सिंग यांनी दिली

राज्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 1358 रुग्ण दगावले. तर 1004 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या महिन्याभरात मुंबईत देखील 10 रुग्णांची भर पडली. म्युकर मायकोसिस नियंत्रणात असला तरी त्यासाठी आवश्यक औषधांचा साठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हाफकीन संस्थेच्या माध्यमातून ही खरेदी करण्यात येत असल्याची माहिती ही परिमल सिंग यांनी दिली.

loading image
go to top