esakal | Prime Criticare Hospital:ठाण्यात रुग्णालयाला आग, चार जणांचा होरपळून मृत्यू

बोलून बातमी शोधा

prime criticare hospital fire
Prime Criticare Hospital:ठाण्यात रुग्णालयाला आग, चार जणांचा होरपळून मृत्यू
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: राज्यात रुग्णालयांना आग लागण्याचं सत्र सुरुच आहे. नाशिकनंतर मुंबईतील विरारमध्ये रुग्णालयात आग लागली. आता समोर आलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातही अशीच दुर्घटना घडली आहे. मुंब्रा कौसा येथील प्राइम क्रिटीकेअर या रुग्णालयात आग लागली. या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समजतंय. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे.

पहाटे पावणे चारच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी झाल्या. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ही लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग लागल्यानंतर रुग्णालयाच्या प्रशासनानं तातडीनं रुग्णांना बाहेर काढलं. रुग्णालयात २६ रुग्ण होते. दरम्यान त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिकेनं या संदर्भातील माहिती दिली आहे.

रुग्णालयाला लागलेल्या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या संदर्भात ट्विट केलं आहे. आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, मुंब्रा येथील prime hospital ला रात्री 3 वाजता आग लागली आगी चे कारण समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा संशय आहे. 3 जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मदत कार्य चालू असून आग आटोक्यात आली आहे.

prime criticare hospital kausa mumbra four patients dead in fire