वर्सोवा येथून अटक केलेल्या टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला जामिन मंजूर

अनिश पाटील
Thursday, 29 October 2020

एनसीबीने 25 ऑक्टोबरला वर्सोवा येथे कारवाई करून प्रीतिका चौहान (वय 30 वर्षे ) या टेव्हीजन अभिनेत्रीला अटक केली होती.

मुंबई : ड्रग्स स्वीकारताना केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने वर्सोवा येथून अटक केलेल्या टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला गुरूवारी स्थानिक न्यायालयाकडून जामिन मिळाला. तिच्याकडून 99 ग्रॅम गांजा सापडला होता.

प्रीतिका मुंबईची स्थायी रहिवासी असल्यामुळे कुठेही पळणार नसल्याचा दावा तिच्याकडून करण्यात आला. दुसरीकडे प्रीतिकाला सोडले, तर ती पुराव्यांशी छेडछाड करू शकते, असे सांगून  एनसीबीकडून तिला जामिन देण्यास विरोध करण्यात आला. पण प्रीतिकाकडे सापडलेली ड्रग्स कमी प्रमाणात असल्यामुळे तिला 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिन देण्यात आला.

महत्त्वाची बातमी : रहिवाशांना दिलासा, उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करताना 1 वर्षाचे भाडे आगाऊ जमा करण्यासाठी एस्क्रो खातं उघडणे बंधनकारक

एनसीबीने 25 ऑक्टोबरला वर्सोवा येथे कारवाई करून प्रीतिका चौहान (वय 30 वर्षे ) या टेव्हीजन अभिनेत्रीला अटक केली होती. तिने फैजल (वय 20 वर्षे ) नावाच्या पेडलरकडून ड्रग्स घेतल्याचा आरोप आहे. शनिवारी एनसीबीने याप्रकरणी वर्सोवा मच्छीमार नगर येथे कारवाई केली. दोघांनाही पकडण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून 99 ग्रॅम गांजा सापडला होता.

अभिनेत्रीवर गांजा सेवनाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एनसीबीतील सूत्रांनी सांगितले. ड्रग्स स्वीकारत असताना तिला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक माहितीच्या आधारे एनसीबीचे अधिकारी दिपक राठोड पर्यंत पोहोचले. दिपक हा वर्सोवातील रहिवासी असून फैजलला अंमली पदार्थ पूरवत होता. 

( संपादन - सुमित बागुल ) 

pritika chauhan gets bail by sessions court arrested by NCB


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pritika chauhan gets bail by sessions court arrested by NCB