भय इथले संपत नाही, कोरोनावरील इंजेक्शनसाठी रूग्णालयांची फरफट

भय इथले संपत नाही, कोरोनावरील इंजेक्शनसाठी रूग्णालयांची फरफट

मुंबई, ता. 22 : मुंबईतील रूग्णसंख्या वाढल्याने कोरोनावरील इंजेक्शनची मागणीही वाढली आहे. कोरोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी गुणकारी ठरलेल्या रेमडेसीवीर तसेच टॉसिलिझुमॅब या औषधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. खासगी रूग्णालयांत ही औषधं उपलब्ध नसल्याने औषधांसाठी त्यांना ही धावपळ करावी लागत आहे. औषधांचा तुटवडा जाणवू लागल्याने औषधांचा पुन्हा काळा बाजार होण्याची शक्यता काही डॉक्टर व्यक्त करत आहेत.

शासकीय व पालिकेच्या रुग्णालयांना रेमडेसिवीरचा पुरवठा होत आहे. मात्र खासगी रूग्णालयांना आवश्यकतेपेक्षा कमी इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. मे-जून महिन्यात अनेक खासगी रूग्णालयांनी मोठ्या प्रमाणात औषधांची मागणी नोंदवली होती. मात्र त्यापेक्षा कमी औषधं उपलब्ध झाल्याने खासगी रुग्णालयांमध्ये सध्या तुटवडा जाणवू लागला आहे. अनलॉक4 नंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय, औषधांची निर्यात सुरू झालीय तसेच इतर राज्यांना अधिक किंमतीत या इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याने सध्या राज्यात औषधांचा तुटवडा जाणवू लागल्याचे ऑल इंडीया फूड एँड लायसेंस होल्डर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.

सध्या रेमडेसिवीर कमी प्रमाणात का होईना पण उपलब्ध होत आहे,मात्र टॉसिलिझुमॅब हे औषध मिळत नसल्याचेही अभय पांडे यांनी सांगितले. सध्याची परिस्थिती मे-जून महिन्या इतकी इतकी वाईट नसली तरी बर्‍याच मोठ्या रुग्णालयांतील रेमडेसिवीर तसेच टॉसिलिझुमॅबचा साठा संपत आला आहे. त्यामुळे ही औषधं मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे असून एफडीएने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास पुढे तुटवडा जाणवू शकतो असे ही पांडे यांनी पुढे सांगितले.

लिलावती रूग्णालयात सध्या 50 ते 55 रूग्ण ICU तसेच ऑक्सिजनवर आहेत. अश्या रूग्णांना इंजेक्शनची गरज असते. दररोज सुमारे 50 ते 55 इंजेक्शनची आवश्यकता असल्याचे डॉ. जलील पारकर यांनी सांगितले. मात्र तेव्हडी औषधं सध्या उपलब्ध होत नाहीत. रेमेडेसिवीर बऱ्यापैकी उपलब्ध होत असली तरी टॉसिलीझूमॅब हे इंजेक्शन सध्या उपलब्ध होत नसल्याचे ही त्यांनी सांगितले. गंभीर रूग्णांसाठी रेमेडेसिवीर पेक्षा टॉसिलिझुमॅब इंजेक्शन अधिक गुणकारी असल्याचे ही पारकर यांनी पुढे सांगितले. 

गेल्या महिन्यात आणखी काही औषध कंपन्यांना रेमडेसिवीर तयार करण्यास मान्यता मिळाल्याने कोरोना संबंधी औषधांचे दर नियंत्रणात आले. जुलै महिन्यात रेमेडीसिवीर इंजेक्शनची किंमत 4 हजार रूपयांवरून 2,626 रुपये झाली. किंमत कमी झाली असली तरी औषधांचा पुरवठा आवश्यकतेनुसार होत नाही. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील परिस्थिती अधिक बिकट झाली. ही परिस्थिती मे - जून मधील तुटवड्यापेक्षा वेगळी नाही. याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ही डॉ जलील पारकर यांनी सांगितले.

राज्य सरकारने जुलै महिन्यात 60 हजार रेमडेसिवीर आणि टॉसिलिझुमॅब इंजेक्शन मागवल्या. टंचाईमुळे ही औषधं सरकारला 3392 रुपये प्रति वायल्स खरेदी करावी लागली, सध्या एका सरकारी रुग्णालयात दररोज सुमारे 35 वायल्सची आवश्यक असते. परंतु  पुरवठा कमी असल्याने फक्त अति गंभीर रुग्णांना ही इंजेक्शन दिली जात आहेत.

( संपादन - सुमित बागुल )

private hospitals in mumbi are struggling to get remdesivir and tocilizumab

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com