मुंबई : खासगी संस्थांकडून क्षयरोग चाचणी

मुंबई महापालिकेने मागवले अर्ज; नियमित चाचण्या होणार
mumbai muncipal corporation
mumbai muncipal corporationesakal
Summary

मुंबई महापालिकेने मागवले अर्ज; नियमित चाचण्या होणार

मुंबई : औषध प्रतिरोध करणाऱ्या क्षयबाधित रुग्णांवर उपचाराला सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्या चाचण्या करण्यासाठी महापालिका (mumbai mucipal carporation) खासगी संस्थांची नियुक्ती करणार आहे. या रुग्णांच्या नियमित चाचण्या करण्याची जबाबदारीही या संस्थांवर सोपविण्यात येणार आहे.

mumbai muncipal corporation
शेअर बाजारावर सावट! आज कोणत्या शेअर्सवर लक्ष केंद्रित कराल?

मुंबईत(mumbai) गेल्या दोन वर्षांत ९७ हजार क्षयबाधित रुग्ण आढळले आहेत; तर औषध प्रतिरोध क्षयबाधित ५ हजार रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. या रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी विविध उपाय करणे गरजेचे असते. या चाचण्यांसाठी पालिकेने खासगी संस्था, नर्सिंग होम्स तसेच रुग्णालयांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

क्षयरोग रुग्णांची ईसीजी(ecg) चाचणी करावी लागते, जेणेकरून औषधांचा त्यांच्या हृदयावर परिणाम होतो आहे का, हे जाणून घेता येते. त्याचबरोबर व्हिज्युअल इव्होक रिस्पॉन्स (व्हीइआर), ऑडीओमेट्री, टूडी ईको, इलेक्ट्रोमॉग्राफी अशा चाचण्यांची जबाबदारी या संस्थांवर सोपविण्यात येणार आहे.केंद्र सरकारने २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी पालिकेकडून आता विविध उपाय केले जात आहेत.

mumbai muncipal corporation
कोल्हापूरमधील शास्त्रीनगर मैदानाचे पालटले रुपडे

औषध प्रतिरोध क्षय म्हणजे

क्षयाचे उपचार अर्धवट सोडल्यास पुन्हा आजार बळावण्याची शक्यता आहे. ही पुन्हा होणारी बाधा काही औषधांना प्रतिसाद देत नाही. काही वेळा १-२ औषधांना प्रतिरोध करणारा क्षय असतो; तर काही क्षय अनेक औषधांना प्रतिसाद देत नाहीत. मुंबईत सध्या मल्टी ड्रग रेझिस्टन क्षयाचे ९ हजार १५ रुग्ण असून एक्सडीआर क्षयाचे ६०७ रुग्ण आहेत.

औषध प्रतिरोध क्षयबाधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांच्या नियमित चाचण्या कराव्या लागतात. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com