खाजगी शाळांचं सरकारच्या आदेशाकडे दुर्लक्ष, पालकांनाच दिली धमकी! वाचा काय आहे प्रकरण

खाजगी शाळांचं सरकारच्या आदेशाकडे दुर्लक्ष, पालकांनाच दिली धमकी! वाचा काय आहे प्रकरण

मुंबई- सानपाडा येथील विब्ग्योर ग्रुप ऑफ स्कूल आणि रायन इंटरनॅशनल स्कूल या दोन खासगी शैक्षणिक संस्थांनी सरकारच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं आहे. या दोन्ही शैक्षणिक संस्थांच्या अनेक शाळा मुंबईत आहेत. या दोन्ही संस्थांनी सरकारच्या नियमाचं पालन न करत पालकांकडे या चालू शैक्षणिक वर्षाच्या फीची मागणी केली आहे.

शालेय शिक्षण विभागाने 30 मार्चला एक परिपत्रक काढलं होतं. लॉकडाऊन दरम्यान शाळा व्यवस्थापन संवेदनशील रहावे आणि पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये असे आवाहन सरकारनं केलं होतं. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक व्हिडिओही शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये शिक्षणमंत्र्यांनी शाळा फी भरण्याची मागणी करत असल्यास पालकांना स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असं सांगितलं होतं. 

तुषार खांडे यांची मुलगी रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहावी इयत्तेतील विद्यार्थिनी आहे. तुषार यांच्या मुलीला गुरुवारी सकाळी झूम ऑनलाईन शिकवणीतून काढून टाकण्यात आलं. बर्‍याच वेळाने, त्याच्या मुलीला संध्याकाळी परत त्या ग्रुपमध्ये जोडले गेलं.

खांडे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेकडे (एनएमएमसी) तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटलं, 15 जुलै ही पेमेंटची अंतिम मुदत आहे आणि ही मुदत होईपर्यंत शाळा थांबली नाही. त्याचा आश्चर्य वाटतं. 

त्यावर शाळेच्या कार्यालयातील कर्मचारी म्हणाले, ते प्रमुखांशी बोलतं होते म्हणून त्यांच्या मुलीला पुन्हा ग्रुपमध्ये अॅड करण्यास वेळ लागला. 

माझी मुलगी रडत होती. ती म्हणाली तिला सोडून प्रत्येकजण ऑनलाईन शिकवणीत शिकत होता, असं ते म्हणाले.  भाजप नेते पांडुरंग आमले यांच्या नेतृत्वात अनेक पालकांनी शाळेबाहेर निषेध नोंदविला. यावेळी पालकांनी शाळा फी आकारत असल्याचा आरोप केला. 

विबग्योर ग्रुप ऑफ स्कूलचे मुंबई आणि नवी मुंबई येथे सहा शाळा आहेत. या शाळेनं देखील विद्यार्थ्यांना धमकी दिली आहे. बुधवारी पालकांना देण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, या शैक्षणिक वर्षासाठी कोणत्याही पालकांनी फी भरलेली नाही. अशा पालकांना असं गृहित धरलं जाईल की आपल्याला यापुढे आमच्या शाळेत शिक्षण घेण्यास काहीही रस नाही. याचा परिणाम म्हणून, आम्ही 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी 13 जुलैपासून आपल्या प्रभागासाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू करू. जर आपण अजूनही आपल्या मुलांना आमच्या शाळेत ठेवू इच्छित असाल तर आम्ही ताबडतोब तुम्हाला थकबाकी भरण्यासाठी विनंती करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com