esakal | परवानगी नसताना मुंबईतून 100 टक्के प्रवाशांची वाहतूक; खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

बोलून बातमी शोधा

परवानगी नसताना मुंबईतून 100 टक्के प्रवाशांची वाहतूक; खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट}

लाॅकडाऊनमूळे रेल्वेची लांब पल्यावरील नियमीत सेवा विस्कळीत आहे.

परवानगी नसताना मुंबईतून 100 टक्के प्रवाशांची वाहतूक; खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट
sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई. ऐन दिवाळीच्या हंगामात खासगी बस वाहतूकदारांनी प्रवाशांची आर्थिक लुट सुरू केली आहे. फक्त 50 टक्के प्रवासी वाहतूकीची परवानगी असताना, खासगी बस वाहतुकदार 100 टक्के प्रवासी वाहतूक करत आहेत. तर एसटीच्या प्रवास भाड्याच्या तुलनेत दुप्पट भाडे आकारत असल्याने सामान्य प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.

दिवाळीच्या निमित्ताने मुंबईबाहेर जाणाऱ्यांना रेल्वे सेवेनंतर  खासगी बस वाहतूकीचा एक पर्याय आहे. त्यासाठी अनेकांनी दिवाळीपुर्वी आपल्या गावी, घरी जाण्यासाठी आसन बुकिंग करणे सुरू केले आहे. ऑनलाईन बुकिंगमध्ये सुद्धा आसने बुक करताना, 100 टक्के प्रवासी वाहतूकीचा पर्याय उपलब्ध आहे. तर प्रत्यक्षात खासगी बस कार्यालयातून सुद्धा सर्रास बुकिंग केली जात आहे. त्यासोबतच एसटी बसच्या भाडे दराच्या तुलनेत दिड पट भाडे आकारण्याची परवानगी असताना, खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांकडून दुप्पट भाडे वसूल केले जात आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबईतील पुढचा कोविड पिक येईल तो आधीपेक्षा कमी असेल, TIFRचं संशोधन

लाॅकडाऊनमूळे रेल्वेची लांब पल्यावरील नियमीत सेवा विस्कळीत आहे. त्यातही एक्सप्रेस, मेलचे जनरल डबे काढले गेले आहेत. अशात वेटिंगमध्ये असलेल्या प्रवाशांना रेल्वेतून प्रवासाची परवानगी नाही. त्यामूळे दिवाळीच्या हंगामात खासगी बसला वाहतूकीला चांगलीच मागणी आहे. मात्र, एसटीच्या शिवशाही, शिवनेरीच्या तुलनेत, खासगी वाहतूकदारांचे तिकीट दर दुप्पट प्रमाणात असल्याने प्रवाशांची आर्थिक लुट केली जात असल्याचे दिसून येत आहे.

मार्ग - एसटी महामंडळ - खासगी वाहतूकदार

  • मुंबई - पुणे - 440 - 800
  • मुंबई - रत्नागीरी - 705 - 1500
  • मुंबई - औरंगाबाद - 740 - 1000

राज्यात फक्त एसटीला 100 टक्के प्रवासी वाहतूकीची परवानगी दिली आहे. त्यामूळे खासगी बस वाहतूकदारांना सुद्धा परवानगी देण्याची मागणी खासगी बस वाहतूकदार संघंटनांकडून केली होती. त्यानुसार परिवहन आयुक्तांनी राज्य सरकारडे तसा प्रस्ताव पाठवला मात्र, अद्याप प्रस्तावावर निर्णय झाला नसल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबईतून येतेय गुडन्यूज ! धारावी कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर

खासगी प्रवासी वाहतुकदार एसटी बसच्या प्रवासी भाड्यांच्या दिडपट भाडे आकारू शकते. त्यापेक्षा जादा भाडे आकारल्यास आणि तशी प्रवाशांची तक्रार प्राप्त झाल्यास खासगी बस पुरवठादारांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असं परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी म्हटलंय. 

private transporters are asking huge tariffs for travel during diwali season