esakal | खासगी शिकवणींना सशर्त परवानगी द्यावी! शिक्षकांवर भाजीपाला विकण्याची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी शिकवणींना सशर्त परवानगी द्यावी! शिक्षकांवर भाजीपाला विकण्याची वेळ

मागील सात महिन्यांपासून कोचिंग क्‍लासेस बंद असल्याने ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची, तर घरप्रपंचाचा गाडा हाकण्यासाठी भाजीपाला विकण्यासह रिक्षा चालविण्याची वेळ ओढवली आहे.

खासगी शिकवणींना सशर्त परवानगी द्यावी! शिक्षकांवर भाजीपाला विकण्याची वेळ

sakal_logo
By
राहुल क्षीरसागर

ठाणे. ः कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून लागू केलेल्या टाळेबंदीत शाळा, महाविद्यालये, खासगी घरगुती व कोचिंग क्‍लासेस देखील बंद ठेवण्यात आले. आता हळूहळू निर्बंध शिथिल करत असताना टप्प्याटप्याने विविध आस्थापना सुरू करण्यासह ग्रंथालयेदेखील सुरू करण्याची मुभा सरकारने दिली आहे. मात्र, कोचिंग क्‍लासेस सुरू करण्याबाबत अद्यापही शासनाने कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. त्यात मागील सात महिन्यांपासून कोचिंग क्‍लासेस बंद असल्याने ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची, तर घरप्रपंचाचा गाडा हाकण्यासाठी भाजीपाला विकण्यासह रिक्षा चालविण्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे आता तरी खासगी क्‍लासेस संचालकांना सशर्त क्‍लासेस घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे. 

गर्भवती महिलेच्या घटस्फोटासाठी कुलिंग कालावधी माफ: हायकोर्ट

राज्यात जवळपास हजारच्या आसपास कोचिंग क्‍लासेस असून सुमारे पाच लाख शिक्षक व इतर कर्मचारी यांचा उदरनिर्वाह चालतो. या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्रातील लोकांना बसला असून अनेकांवर बेरोजगारीची व उपासमारीची वेळ आली आहे. भाड्याने क्‍लासेससाठी गाळे घेतलेत, त्यांचे भाडे थकले आहेत. काहींच्या घराचेही भाडे थकले असून हातात पैसेच नसल्याने राशन कसे खरेदी करायचे यांसारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाने अनलॉक मध्ये ग्रंथालयही सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे आता तरी खासगी क्‍लासेस संचालकांना सशर्त क्‍लासेस घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कोचिंग क्‍लासेस संचालक संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे. 

क्‍लासेस संचालक घरखर्च, क्‍लासेस रूम व गाळा भाडे, शिक्षक पगार अशा अनेक गोष्टींचा विचार करून मानसिक तणावाखाली गेले आहेत. त्यात विद्यार्थीसुद्धा शासनाने शैक्षणिक धोरण जाहीर न केल्याने बिनधास्त व बेफिकिर झाले आहेत. तसेच ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे. त्यामुळे - विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी. 
- सतीश देशमुख,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कोचिंग क्‍लासेस संचालक संघटना. 

Private tuition should be allowed conditionally Time to sell vegetables to teachers

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top