राज्यातील भंगार वाहनांचा प्रश्‍न लवकरच सुटणार; केंद्र सरकार स्क्रॅप पॉलिसी आणणार 

प्रशांत कांबळे
Sunday, 10 January 2021

मुंबईसह राज्यभरात रस्त्यांवर भंगार वाहने पडली आहेत. अपघात, नादुरुस्त आणि वयोमर्यादा संपलेल्या वाहनांना रस्त्यांवरील जागेत भंगार अवस्थेत सोडले जाते.

मुंबई  ः मुंबईसह राज्यभरात रस्त्यांवर भंगार वाहने पडली आहेत. अपघात, नादुरुस्त आणि वयोमर्यादा संपलेल्या वाहनांना रस्त्यांवरील जागेत भंगार अवस्थेत सोडले जाते. त्यामुळे रस्त्यांवरील जागा व्यापल्या जात असून, वाहतूक कोंडीही होते. त्यासाठी लवकरच केंद्र सरकार वाहन स्क्रॅप पॉलिसी आणणार आहे. अशा वाहनांची विल्हेवाट लावण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. 

 

मुंबई महानगरपालिकेने 2017 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे सात हजारपेक्षा जास्त बेवारस गाड्या मुंबईच्या रस्त्यांवर भंगार अवस्थेत आढळून आल्या होत्या. अशा भंगार गाड्यांची संख्या आता 10 हजारपेक्षा जास्त आहे. शिवाय राज्य आणि केंद्रीय महामार्गांवर झालेल्या अपघातातील भंगार वाहने रस्त्यांच्या कडेलाच सोडल्याचे दिसते. अशा गाड्यांमुळे जागा व्यापली जात असून, वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अशा वाहनांची नियमानुसार विल्हेवाट लावण्यासाठी राज्य सरकार वाहनांची स्क्रॅप पॉलिसी आणण्याच्या विचारात असताना केंद्र सरकारचे मात्र यासंदर्भातील काम पूर्णत्वास आले आहे. लवकरच या पॉलिसीची घोषणा होण्याची शक्‍यता ढाकणे यांनी वर्तविली. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

केंद्राच्या स्क्रॅप पॉलिसीच्या घोषणेनंतर अशा भंगार वाहनांची विल्हेवाट लावण्यास मदत होणार आहे. त्यामध्ये अशा वाहनांचे पार्ट वेगवेगळे आणि त्याचा चेचिस नंबर आरटीओला जमा करावा लागणार आहे. त्यानंतर अशा वाहनांची विल्हेवाट लावता येणार आहे. 
- अविनाश ढाकणे,
परिवहन आयुक्त 

The problem of scrap vehicles in the state will be solved soon The central government will introduce a scrap policy

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The problem of scrap vehicles in the state will be solved soon The central government will introduce a scrap policy