कामगारांच्या समस्या लवकरच सोडविणार; पालिका आयुक्तांची इंटकच्या शिष्टमंडळाला ग्वाही 

कामगारांच्या समस्या लवकरच सोडविणार; पालिका आयुक्तांची इंटकच्या शिष्टमंडळाला ग्वाही 


वाशी : नवी मुंबई महापालिका आस्थापनेवर काम करणाऱ्या विविध संवर्गातील कामगार व अधिकाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागू नये. त्यांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात. ही पालिका प्रशासनाची भूमिका असून, इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सादर केलेल्या सर्व समस्या सोडविण्याची ग्वाही पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शुक्रवारी (ता.27) दिली. 

पालिका सेवेत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आलेले एकत्रित मासिक वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या संवर्गानुसार निर्धारित केलेले मुळ वेतन, अधिक घरभाडे भत्ता मिळावा. किमान वेतन कायद्याखाली चतुर्थ श्रेणी कामगार, शिपाई, प्लंबर, फिटर, इलेक्‍ट्रीशियन, मोटर मेकॅनिक हे कुशल कामगार आहेत. म्हणून त्यांना कुशल कामगारांचे संवर्गनिहाय मुळ वेतन, अधिक महागाई भत्ता व घरभाडे भत्ता मिळावा. तसेच ठोकवेतनावरील कर्मचारी व कुशल कामगार यांना प्रत्येक आठवड्यास दोन साप्ताहिक सुट्ट्या, आठ किरकोळ अर्जित रजा, 15 अर्जित रजा व 15 वैद्यकीय रजा प्रत्येक वर्षासाठी मिळाव्यात. सेवा खंडित कालावधीत काम केलेल्या कामगारांचे व कर्मचाऱ्यांचे काम केलेले वेतन अदा करण्यात यावे, आदी समस्या इंटकच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांसमोर मांडल्या.

यावेळी सर्व समस्या सोडविण्याची ग्वाही आयुक्तांनी दिली. तसेच पालिकेच्या कोव्हिड काळात काम करणाऱ्या सर्वच कामगारांना आजपर्यंतचा कोव्हिड भत्ता देण्यासह अन्य मागण्यांवरही लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. यावेळी पालिकेचे माजी उपायुक्त ऍड. सिद्धार्थ चौरे, कमलेश आठवले, सुहास म्हात्रे, प्रल्हाद गायकवाड, विजय कुरकुटे, दिनेश गवळी, मंगेश गायकवाड, कुणाल खैरे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. 

The problems of the workers will be solved soon Municipal Commissioner testifies to Intac's
----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com