मुंबई विद्यापीठाचे सिनेट अधिवेशन; प्राध्यापक, परिषदेचे सदस्यही करणार विरोध | Mumbai University Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai University

मुंबई विद्यापीठाचे सिनेट अधिवेशन; प्राध्यापक, परिषदेचे सदस्यही करणार विरोध

मुंबई : मुंबई विद्यापीठ (Mumbai University) प्रशासनाने मंगळवारी सुरू होणारे सिनेट अधिवेशन (senate session) ऑनलाईन पद्धतीनेच (online) घेण्याचा हट्ट कायम ठेवला आहे; मात्र सिनेट सदस्यांसोबत आता प्राध्यापक संघटनेचे प्रतिनिधी आणि व्यवस्थापन परिषदेतील काही सदस्यांनी हे अधिवेशन ऑफलाईन (offline) घेण्याचा आग्रह धरला आहे. हे अधिवेशन ऑनलाईन झाले तर आम्ही विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात येऊन बसून राहू, असा इशाराही दिला आहे.

हेही वाचा: पालघर: ७०५ जणांचा सामुदायिक विवाह सोहळा; राज ठाकरे व शर्मिला ठाकरे करणार कन्यादान

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने सर्व पूर्ववत झालेले असताना विद्यापीठ प्रशासनाकडून सिनेट ऑनलाईन घेण्याचा हट्ट का, असा सवाल सिनेट सदस्यांनी केला. विद्यापीठाने सिनेट अधिवेशन हे विद्यार्थी, प्राध्यापक आणि एकूणच शैक्षणिक कामकाजासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे ते ऑफलाईन झाल्यास बरेच प्रश्नही सुटतील, त्यामुळे ते ऑफलाईन घेण्याची मागणी केली जात आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे पत्र लिहून आपला विरोध दर्शवल्याची माहिती देण्यात आली.

सिनेट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नुकताच सिनेट सदस्यांसाठीचा चहापान कार्यक्रम पार पडला. तोही ऑनलाईन ठेवण्यात आल्याने त्यावर युवा सेनेसह इतर सिनेट सदस्यांनी बहिष्कार टाकला होता. यामुळे या अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर बुक्टो, युवा सेनेचे सदस्य कुलगुरूंची भेट घेऊन हे अधिवेशन ऑफलाईन घेण्याची माणगी करणार आहेत. ही मागणी मान्य न झाल्यास बुक्टोचे सदस्य विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील दीक्षांत सभागृहात बसून राहतील, असा इशाराही देण्यात आला.

Web Title: Professor And Senate Members Against Mumbai University Online Senate Session Mumbai University Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai UniversitySenate