नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही सह्याद्री वाहिनीवर कार्यक्रम; लवकरच वेळापत्रक होणार जाहीर

तुषार सोनवणे
Monday, 28 September 2020

राज्यातील शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. 

मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील शिक्षणाचा प्रश्न ऐरणाीवर आला आहे. त्यामुळे शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत अद्यापही सरकारकडे ठोस उत्तर नाही. राज्यातील शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. 

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना दूरदर्शनची वेळ मागितली होती. दूरदर्शनकडून ही वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे या नववी ते बारावीचे मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे वेळापत्रक लवकरच जारी करण्यात येणार आहे. याआधी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने विद्या प्राधिकणाच्या सहकार्याने पहिली ते आठवच्या विद्यार्थ्यांसाठी 'टिलीमिली' हा कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर सुरू आहे. मात्र नववी ते 12 वीच्या विद्यार्थ्यासाठी तसा कोणताही कार्यक्रम नव्हता.

मास्क वापरा!, मुंबईत १३ दिवसात ९ हजार नागरिकांवर कारवाईचा बडगा

त्यामुळे नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दूरदर्शनवर सुरू होणाऱ्या कार्यक्रमामुळे फायदा होणार आहे. केंद्र सरकारने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा 21 सप्टेंबर पासून सुरू कराव्यात अशा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. परंतु राज्यातील कोरोनाची बिकट परिस्थिती पाहता 21 सप्टेंबर पासून शाळा सुरू होणार नाही. त्यामुळे दूरदर्शनच्या कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू रहावे यासाठी मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रयत्न सुरू केले होते. 

राज्यात कधी शाळा सुरू होणार?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षण बंद आहे. परंतु केंद्राने 21 सप्टेंबर पासून शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परंतु देशात सर्वात बिकट परिस्थिती महाराष्ट्र राज्यात आहे. त्यामुळे राज्यात 21 सप्टेंबर पासून शाळा सुरू होऊ शकत नाही. मग राज्यातील शाळा सुरू होणार तरी कधी हा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. शिक्षण विभाग आणि संस्थाचालक महामंडळाच्या बैठकीतही संस्थाचालकांनी शाळा सुरू करण्यास नकारार्थी मत मांडले होते. विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता दिवाळी नंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले

------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Program on Sahyadri channel for students of 9th to 12th standard also