
नामपूर : केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर २० टक्के शुल्कवाढ झाल्याने गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झाली आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी युवा कांदा उत्पादक शेतकऱ्याने चिराई (ता. बागलाण) येथील कार्यक्रमात बंदरे आणि मत्स्यमंत्री नीतेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ घालून आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.