
विरार: विधानसभा निवडणुकीनंतर वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापालिकेत २९ गावे पुन्हा समाविष्ट करण्यासंबंधी राज्य सरकारने ३१ मे रोजी अधिसूचना जाहीर केली होती. त्यावरील हरकतींवर १६ ते २० डिसेंबरपर्यंत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेतली जाणार आहे. त्यासाठी एका पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.