Pune land Scam
esakal
मुंबई
Pune Land Scam : अजितदादा यांचे पुत्र पार्थ पवार यांना पुणे पोलिस पाठीशी घालत आहेत का? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल, नेमकं काय प्रकरण?
High Court Seeks Clarity on FIR Missing Parth Pawar’s Name : पुणे भूखंड गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांचे नाव एफआयआरमध्ये नाही यावर उच्च न्यायालयाने सरकारला सवाल केलाय.
मुंबई : ‘‘पुणे भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणातील (Pune land Scam) ‘एफआयआर’मध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या (Parth Pawar) नावाचा समावेश का नाही, पार्थ यांच्या नावाचा उल्लेख न करून पुणे पोलिस त्यांना पाठीशी घालत आहेत का,’’ अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली.
